वेंगुर्ला शहरामध्ये गेली कित्तेक वर्षे पोलिस पाटील नसल्याने शहरातील नागरीकांची गैरसोय - ॲड. मनीष सातार्डेकर
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
वेंगुर्ला शहरामध्ये गेली कित्तेक वर्षे पोलिस पाटील नसल्याने नागरीकांचे हाल होत असुन शहारातील नागरीकांना पोलिस पाटीलांच्या दाखल्यासाठी वणवण फिरावेलागत असुन प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकरते ॲड मनीष सातार्डेकर यानी केला आहे.
वेंगुर्ला शहरामध्ये गेली कित्तेक वर्षे पोलिस पाटील पद रिक्त असल्यानेशहरातील लोकांना पोलिस पाटीलांचा दाखला हवा असल्यास दाखल्या करीता उभादांडा येथे जावे लागते व त्यात नागरीकांचा बराच वेळ व पैसा विनाकारण खर्ची
होतो. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी यांना विविध दाखल्यांकरीता वेळोवेळी पोलिस पाटील दाखल्याची आवश्यकता भासत असते. तसेच वारस तपास, उत्पन्नाचा
दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, जात पडताळणी, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र अशा विविध दाखल्याकरीता व विविध कामाकरीता पोलिस पाटील यांच्या
दाखल्याची आवश्यकता भासते व शहरामध्ये पोलिस पाटील पद रीक्त असल्याने शहरातील नागरीकांचे दाखल्यासाठी चांगलेच हाल होत आहेत. काही दिवसापुर्वीच
वेंगुर्ला तालुक्यातील गावागावामध्ये पोलिस पाटील यांची पदे भरण्यात आली वेंगुर्ला शहरासाठी देखील पोलिस पाटील पदाची भरती घेण्यात आली. परंतु वेंगुर्ला शहर
सोडुन इतर ठिकाणच्या पोलिस पाटलांना नियुक्ती पत्र देण्यात आले मात्र वेंगुर्ला शहरासाठी अद्यापही पोलिस पाटील नेमण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सध्या
गावागावामध्ये पोलिस पाटील पदे भरण्यात आलेली आहेत एकाच गावामध्ये वा वाडीमध्ये पोलिस पाटील पदे भरण्यात आली मात्र वेंगुर्ला शहरासाठी पोलिस पाटील पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात आली मात्र अद्यापपर्यंत वेंगुर्ला शहराला पोलिस पाटील देण्यात आलेले नाही त्यामुळे वेंगुर्ला शहराचा तसेच शहरातील लोकसंख्येचा विचार करता किमान एक तरी पोलिस पाटील शहरामध्ये असणे अत्यंत आवश्यक
आहे. असे असले तरी वेंगुर्ला शहरासाठी घेण्यात आलेल्या पोलिस पाटील भरतीमधील शहरासाठी असणारे पोलिस पाटील पद अद्यापही रिक्त असुन पोलिस पाटील नसल्याने नागरिकांचे दाखल्यासाठी हाल होत आहेत. संबंधीत प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहरातील नागरीकांचा प्रशासनाच्या विरुद्ध रोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे वेंगुर्ला शहरातील नागरीकांची गैरसोय पाहता
वेंगुर्ला शहरासाठी त्वरीत पोलिस पाटील नेमण्यात यावेत अन्यथा वेंगुर्ला शहरातील नागरीकांना दाखल्यासाठी लागणाऱ्या पोलिस पाटील यांच्या दाखल्यामध्ये सुट
देण्यात यावी व नागरीकांची होणारी गैरसोय तात्काळ थांबवावी असे मत सामाजिक कार्यकर्ते ॲड. मनीष सातार्डेकर यांनी व्यक्त केले आहे.
Post a Comment
0 Comments