Type Here to Get Search Results !

"मोदी सेवा महीना" उपक्रमांतर्गत आरोंदा भटपावणी येथे आरोग्य शिबिर संपन्न

"मोदी सेवा महीना" उपक्रमांतर्गत आरोंदा भटपावणी येथे आरोग्य शिबिर संपन्न

नवप्रभात NEWS / सावंतवाडी 


पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिनांक 17 सप्टेंबर 2024 ते दिनांक 16 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यभर "मोदी सेवा महीना" हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभर मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. 
उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या व रेडी येथील रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या समन्वयातून हे सामाजिक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. राज्यातील सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या भागात वैद्यकीय सेवेपासून वंचित असलेल्या भागातील लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याकरिता उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर लोकसहभागातून सामुदायिक आरोग्य शिबिरे राबविण्यात येत असून श्री रामेश्वर नाईक हे या शिबिर आयोजन कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक आहेत. स्थानिक पातळीवर भाजपा वैद्यकीय आघाडीकडून या शिबिरांसाठी समन्वयकाची भूमिका बजावली जात आहे.
याप्रसंगी आरोंदा सरपंच सौ. गीतांजली वेळणेकर, उपसरपंच श्री. गोविंद केरकर, ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊळकर, सिद्धेश नाईक, सौ स्मिताली नाईक, सौ शिल्पा नाईक, सायली साळगावकर, सुभद्रा नाईक, श्री विनायक गावडे, रेडकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे सेक्रेटरी श्री. राजेंद्र कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. रेडकर हॉस्पिटलचे सेक्रेटरी श्री. राजेंद्र कांबळी यांनी मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले तसेच आरोग्य शिबिराची रूपरेषा सांगितली. सरपंच सौ. गीतांजली वेळणेकर व उपसरपंच आबा केरकर यांनी या शिबिराचे महत्त्व सांगून जास्तीत जास्त ग्रामस्थांनी आपला सहभाग द्यावा व आपल्या आरोग्य तपासण्या करून घ्याव्यात असे आवाहन केले. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या शिबिरांचे तसेच अत्यल्प उत्पन्न धारक गटातील व निर्धन गटातील नागरिकांसाठी शासनाने राबविलेल्या विविध आरोग्य योजनांचे स्वरूप त्यांनी समजावून सांगितले. 
रेडकर हॉस्पिटलचे डॉ. राकेश खटावकर यांनी 65 रुग्णांच्या आरोग्य तपासणी केल्या. पैकी 46 लोकांच्या रक्त तपासणी केल्या गेल्या व 18 लोकांचे ईसीजी काढण्यात आले. गरजू रुग्णांना मोफत औषधे व गोळ्या देण्यात आल्या. रोगांचे निदान झालेल्या रुग्णांना शासकीय योजनांच्या समन्वयातून पुढे मोफत उपचार करण्यात येणार आहेत. 
सदर शिबिरास आरोग्य सेवक प्रशांत सावंत भोसले, आरोग्य सेवक यु.टी. राणे, आशा सेविका मानसी नाईक, रेडकर हॉस्पिटलचा स्टाफ सोनाली नाईक, सलमा, प्रिया, रेडी पीएचसी हिंदलॅबच्या दिपाली नाईक, मळेवाड पीएचसीच्या ईसीजी विभागाच्या संतोषी मळगावकर, भटपावणी आरोग्य सेविका एस. ए. हळदणकर, विष्णू नाईक या सर्वांच्या सहभागातून आजचे आरोग्य शिबिर यशस्वी झाले. श्री राजेन्द्र कांबळी यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले आणि शिबिरात सहभाग घेऊन शिबिर यशस्वी केल्याबद्दल सर्व कर्मचारी वर्गाचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments