Type Here to Get Search Results !

माहिती अधिकाराचा गावाच्या हितासाठी वापर करा..कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे नारुर ग्रामस्थांना आवाहन

माहिती अधिकाराचा गावाच्या हितासाठी वापर करा..
कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे नारुर ग्रामस्थांना आवाहन 

   मनोज देसाई 
नवप्रभात NEWS 

गावाच्या विकासासाठी युवकांनी पुढाकार घ्यायला हवा.‌ आजच्या तंत्रज्ञान युगात पुढे जाण्यासाठी डिजिटल यंत्रणेचाही वापर करणे गरजेचे असून गावाच्या हितासाठी युवकांनी माहितीचा अधिकार आणि शोशल मीडिया याचा सजकपणे वापर करावा, असे आवाहन कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी केले.‌
शासन यंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन व्हावे, प्रशासकीय कार्यपद्धती, नियम व इतर शासकीय कामांमध्ये गैरव्यवहार होऊ नये, तसेच शासकीय कार्यपद्धतीबद्दल सामान्य जनतेला साशंकता वाटू नये व त्यांची कामे विनाविलंब, सहजगत्या व्हावीत यासाठी 'माहितीचा अधिकार' या कायद्याची निर्मिती झाली असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने २८ सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर शनिवार दि. २८ कुडाळ पोलिसांनी माहितीच्या अधिकाराबाबत नारुर गावातील ग्रामस्थांना मार्गदर्शन करुन साजरा केला. 
यावेळी कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, पोलीस उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर, पोलीस काॅन्स्टेबल ज्योती शिरोडकर व पोलीस स्थानकाचे इतर अधिकारी आणि कर्मचारी तसेच नारुरचे उपसरपंच मुकुंद सरनोबत, जगदीश सरनोबत, ग्रामपंचायत सदस्य सानिका सरनोबत, ग्रामपंचायत सदस्य शेजल चव्हाण, शिवाजी राऊळ, मधुकर तेरसे, अमित सरनोबत, महादेव लुडबे, किशोर सरनोबत, प्रताप राणे, भगवान जाधव, संजय आचरेकर, संतोष तांबे, सागर परब, एकनाथ सरनोबत, चंद्रकांत मेस्त्री, श्री बिले, सौ. कदम, सावित्री सरनोबत, दिगंबर माने आदी उपस्थित होते.
सुरुवातीला पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी नारुर गावातील ग्रामस्थांना शोशल मीडिया व माहितीचा अधिकार याबाबत मार्गदर्शन करुन समाजाच्या हितासाठी कशाप्रकारे वापर करायला हवा याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच शासनयंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन व्हावे, प्रशासकीय कार्यपद्धती, नियम व इतर शासकीय कामांमध्ये गैरव्यवहार होऊ नये यासाठी कशा पद्धतीने काम करावे याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस स्थानकाच्या आवारात पोलीस उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर आणि पोलीस काॅन्स्टेबल ज्योती शिरोडकर यांनी नारुर ग्रामस्थांना माहितीचा अधिकार कायदा काय आहे आणि त्याचा कशा पद्धतीने वापर केला पाहिजे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विविध दाखले देऊन माहिती दिली.‌ तसेच माहिती अधिकार आणि शोशल मीडिया याबाबत प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले.
दरम्यान, नारुर गावात अशा प्रकारचे कार्यक्रम राबवल्यास कुडाळ पोलिसांच्या वतीने ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच समाजोपयोगी उपक्रमांना सहकार्य राहील, असे आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments