गोवा येथील ट्रॅव्हल्स कंपनीच्या मॅनेजर कडून सिंधुदुर्गातील चालकाला धक्काबुक्की करत मारण्याची धमकी दिल्याने चालक वर्ग आक्रमक
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
गोवा ते पुणे असा रोज प्रवास करणाऱ्या गोव्यातील एका नामवंत ट्रॅव्हल्स कंपनीच्या मॅनेजर कडून ड्रायव्हरला कामावरून काढून टाकत मारण्याची धमकी देत त्या ड्रायव्हरला धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चालक वर्गाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गोवा ते पुणे अशी रोज वाहतूक करणाऱ्या या नामवंत ट्रॅव्हल्स कंपनीच्या लक्झरी मधून बेकायदेशीर रित्या मालवाहतूक केली जाते महाराष्ट्रातील आर टी ओच्या आशीर्वादाने प्रवाशांच्या जीवाशी खेळले जात आहे .
बेकायदेशीर रित्या मालवाहतूक केल्या जाणाऱ्या या लक्झरी बस मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात माल भरून त्याची विनापरवाना वाहतूक केली जाते त्यामुळे अशा लक्झरी बस ला अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो .
गोव्यातील या नामवंत ट्रॅव्हल्स कंपनीच्या मॅनेजरने सिंधुदुर्गातील चालकाला धक्काबुक्की करून मारण्याची धमकी दिल्यानंतर सिंधुदुर्गातील लक्झरी चालक आक्रमक झाले असून गोव्यातील या नामवंत ट्रॅव्हल्स कंपनीच्या मॅनेजर विरोधात आक्रमक भूमिका घेऊन बेकायदेशीर मालवाहतूक करणाऱ्या गोव्यातील लक्झरी विरोधात रितसर तक्रार करण्याच्या पवित्र्यात आहेत.
पुणे ते गोवा असे प्रवासी वाहतूक करणारे लक्झरी प्रवासी वहातुकीबरोबरच मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मालवाहतूक करत आहेत. हे पूर्णतः नियमबाह्य व बेकायदेशीर आहे प्रवाशांबरोबरच क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात या लक्झरी मधून मालवाहतूक केली जाते या प्रकाराकडे आरटीओ कडून डोळेझाक का केली जाते असा प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे अशा प्रकारे बेकायदेशीर वाहतूक करुन प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या लक्झरी गाड्यांवर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे बनले आहे.
Post a Comment
0 Comments