सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भजन मंडळांची दिशाभूल.... अर्ज सादर करून साहित्य नमिळालेल्या मंडळाकडून तीव्र नाराजी..
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
गणेशोत्सवा दरम्यान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राजकीय लोकांकडून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील भजन मंडळांना भजनाचे साहित्य देण्याकरिता ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले परंतु ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करून गणपतीचे अकरा दिवस उलटून गेले तरी भजनाचे साहित्य न मिळालेल्या मंडळाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय लोकांकडून भजन मंडळांना भजनाचे साहित्य वाटप करण्यात आले असेच म्हणावे लागेल. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी भजन मंडळांना ई सेवा केंद्रांवर पैसे देखील मोजावे लागले आहेत ज्या भजन मंडळांना ऑफलाइन व ऑनलाइन अर्ज सादर करून देखील अद्याप पर्यंत भजन साहित्य नमिळाल्याचे भजन मंडळांनी आमच्या निदर्शनास आणून दिले आहे.
काही ठिकाणी वाटप करण्यात आलेले भजन मंडळांसाठी चे साहित्य हे आपल्याच पक्षातील लोकांच्या भजन मंडळांना देऊन त्या ठिकाणच्या इतर भजन मंडळांनी सादर केलेल्या अर्जांना केराची टोपली दाखविण्यात आली आहे.
अशा राजकीय लोकांना जर आपल्याच पक्षातील लोकांच्या भजन मंडळांना भजनाचे साहित्य द्यावयाचे होते तर मतदार संघातील सर्वच भजन मंडळांचे ऑनलाइन ऑफलाइन अर्ज मागवून दिशाभूल करण्याची काय गरज होती अशा तीव्र प्रतिक्रिया ऑनलाइन ऑफलाइन अर्ज सादर करून देखील भजन साहित्य न मिळालेल्या व ऑनलाईन प्रक्रियेसाठी आर्थिक भुर्दंड सोसलेल्या भजन मंडळाकडून उपस्थित केल्या जात आहेत.
Post a Comment
0 Comments