Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले उभादांडा हायस्कूलचे गणित संबोध परीक्षेत सुयश

मयंक नंदगडकर, प्राजक्ता भोकरे, प्रतिक नाईक, ईशा गिरप, यश चेंदवणकर व प्रज्ञा आरावंदेकर

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळामार्फत ऑगस्ट२०२४ मध्ये घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. स्कूलमधून बसलेले ३८ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला.
स्कूलमधील मयंक नंदगडकर, प्राजक्ता भोकरे, प्रतिक नाईक, ईशा गिरप, यश चेंदवणकर व प्रज्ञा आरावंदेकर यांनी अनुक्रमे प्रथम पाच क्रमांक पटकाविले. या सर्वांची गणित प्राविण्य परिक्षेसाठी निवड झाली आहे. यांना मुख्याध्यापक उमेश वाळवेकर व श्री.सुकी यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था चेअरमन विरेंद्र कामत आडारकर, सचिव रमेश नरसुले, व्हाईस चेअरमन रमेश पिगुळकर यांनी अभिनंदन केले आहे.
 मयंक नंदगडकर, प्राजक्ता भोकरे, प्रतिक नाईक, ईशा गिरप, यश चेंदवणकर व प्रज्ञा आरावंदेकर

Post a Comment

0 Comments