ट्रॅव्हल्स कंपनींना हातीशी धरुन पुणे ते गोवा थेट अमली पदार्थांची वाहतूक महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणा गप्प का ?
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
पुणे ते गोवा अशी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बस मधून मालवाहतुकीच्या नावाखाली फळांच्या बॉक्समध्ये अमली पदार्थ घालून त्याची राजरोसपणे वाहतूक केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे मात्र या साऱ्या प्रकाराला महाराष्ट्रातील आरटीओ आणि पोलीस यंत्रणा पाठीशी का घालत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुणे ,सातारा,कोल्हापूर,रत्नागिरी ,रायगड सिंधुदुर्ग एवढे महाराष्ट्रातील जिल्हे पार करून देश विदेशातील पर्यटकांचे माहेरघर असणाऱ्या गोव्यात अमली पदार्थांची होणारी तस्करी कुणाच्या आशीर्वादाने होते असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अलीकडेच अमली पदार्थाची वाहतूक करण्यास विरोध करणाऱ्या एका चालकाला देखील धक्काबुक्की करून दमदाटी करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे.
या अगोदर अशाच प्रकारची अमली पदार्थांची वाहतूक करताना गोवा पोलिसांनी कारवाई केल्याचे उदाहरण आहे.
पुणे ते गोवा अशी अमली पदार्थांची वाहतूक करताना दोघांना अटक करून त्याच्याकडून २० लाख ५ हजार रुपये किमतीचे कोकेन जप्त केले होते.
हे अंमली पदार्थ पुण्याहून गोव्यात आणले होते. अशी माहिती म्हापसा पोलिसांना मिळाली होती त्यानुसार दोन युवकांकडून १०३ ग्रॅम व१०२ ग्रॅम असे दोघांकडून मिळून २० लाख ५० हजार रुपये किमतीचा कोकेन म्हापसा पोलिसांनी जप्त करून दोघांना अटक केली होती असे असताना देखील पुण्यावरून गोव्याला जाणाऱ्या लक्झरी बस मधून केली जाणारी अमली पदार्थांची वाहतूक महाराष्ट्रातील पोलिसांना का सापडत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Post a Comment
0 Comments