Type Here to Get Search Results !

मांडेशेत - गोठोस येथील रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक

मांडेशेत - गोठोस येथील रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक 

 रस्त्यावर माती 
 दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका 
 साबांखाचे दुर्लक्ष 

   मनोज देसाई 
नवप्रभात NEWS 

कुडाळ तालुक्यातील नारुर - गोठोस मांडेशेत येथे रस्त्यालगतच्या गटारातून पाण्यासोबत वाहून आलेली माती रस्त्यावर आल्याने येथील रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन येथील माती काढून रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी केली आहे. 
या मार्गावर याआधी अनेक लहान मोठे अपघात झाले आहेत. यात दुचाकीस्वारांचा समावेश असून काही जण गंभीर जखमी झालेत, तर काहींच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. भविष्यात मोठा अपघात घडून जीवितहानी टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तातडीने दखल घेऊन रस्त्यावरील माती बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा. 
गटाराची दुरुस्ती आवश्यक 
येथील रस्त्याच्या लगत डोंगर असल्याने पावसाळ्यात रस्त्यालगतच्या गटारातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. डोंगर उतारावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग जास्त असल्याने येथील गटाराला अनेक ठिकाणी भगदाड पडले असून गटाराचे पाणी रस्त्यावर शिरूर पाण्यासोबत वाहून आलेली माती रस्त्यावर साचून राहते. त्यामुळे साबांखाने येथील गटाराची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments