उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष वैद्यकीय कक्षाद्वारे आंबोली येथे विनामूल्य सामुदायिक आरोग्य शिबीराचा शुभारंभ
नवप्रभात NEWS / सावंतवाडी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष वैद्यकीय कक्षाद्वारे सावंतवाडी तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायत येथे विनामूल्य सामुदायिक आरोग्य शिबीराचा शुभारंभ
आंबोली ग्रामपंचायत येथे उपमुख्यमंत्री सामुदायिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आंबोलीच्या सरपंच सावित्री पालेकर यांच्या हस्ते करण्यात आले , यावेळी माजी पंचायत समिती सदस्य व भारतीय जनता पार्टी आंबोली मंडलाचे श्री. संदीप गावडे हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते .तसेच भाजपाच्या वैद्यकीय आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा संघटक डॉ. रामचंद्र चव्हाण यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. रामचंद्र चव्हाण यांनी या वैद्यकीय शिबिराबाबत तसेच उपमुख्यमंत्री विशेष वैद्यकीय मदत कक्ष आणि इतर आरोग्य योजना संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच श्री. संदीप गावडे यांनी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली . त्याचप्रमाणे केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक धोरणाबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले.
या शिबिरात एकूण ७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली ३१ रुग्णांच्या रक्त आणि इतर चाचण्या करण्यात आल्या तर तीन रुग्णांना अधिक उपचारांसाठी पुढे प्रस्तावित करण्यात आले.
सावंतवाडीच्या राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेच्या आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉक्टर पाटील व त्यांचे इतर सहकारी डॉक्टर आणि आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर यांनी रुग्ण तपासणी केली. यावेळी अंबोली ग्रामपंचायत सदस्या सौ छाया नार्वेकर, आंबोली गाव भाजपा अध्यक्ष श्री रामचंद्र गावडे, आंबोली माजी उपसरपंच सौ नमिता राऊत, आंबोली हायस्कूलचे संचालक श्री विजय परब, आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र निरीक्षक श्री गावडे, अशा सेविका, महिला बचत गट, आंबोली ग्रामपंचायत सदस्य इतर कर्मचारी व आंबोली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments