Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले येथील मदर तेरेसा स्कूलच्या व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणामुळे मुले राहिले क्रिकेट खेळण्यापासून वंचित.

वेंगुर्ले येथील मदर तेरेसा स्कूलच्या व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणामुळे मुले राहिले क्रिकेट खेळण्यापासून वंचित. 

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

शनिवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी वेंगुर्ले कॅम्प येथील मैदानावर शालेय मुलांसाठी तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत शालेय मुलांना सहभागी होण्यासाठी प्रत्येक शाळेने आपल्या शालेय मुलांच्या संघाची ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक होते.या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या तालुक्यातील इतर शाळांनी आपल्या संघांची ऑनलाइन नोंदणी केलेली होती.
सामने सुरू झाल्यावर मदर तेरेसा स्कूल च्या टिमची ऑनलाईन नोंदणी झालेली नसल्याचे लक्षात आल्यावर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या या शाळेच्या शिक्षकांना विचारले असता त्याबाबत आपल्याला माहित नसल्याचे सांगण्यात आले.
मुलांना त्या मैदानावर घेऊन जाणाऱ्या संबंधित शिक्षकांना याबाबतची पूर्ण कल्पना असणे आवश्यक होते असे असताना देखील वेंगुर्ले तालुक्यातील मदर तेरेसा या स्कूलच्या व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे मुलांच्या क्रिकेट संघाची ऑनलाइन नोंदणी न झाल्यामुळे क्रिकेट खेळण्यासाठी कॅम्प मैदानावर गेलेल्या मदर तेरेसा स्कूलच्या मुलांना ऑनलाईन नोंदणी नसल्यामुळे क्रिकेट न खेळताच माघारी परतावे लागले या प्रकारामुळे पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments