वेंगुर्ले नगर परिषदेतर्फे “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता" अभियान
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ०२ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याची पूर्वतयारी म्हणून, स्वच्छ भारतासाठी स्वयंप्रेरणा आणि सामुहिक कृतीला बळकटी देण्यासाठी २०१७ पासून दरवर्षी स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवडा साजरा केला जात आहे. दिनांक १४ सप्टेंबर २०२४ ते ०२ ऑक्टोबर २०२४ दरम्यान स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवडा आयोजित करण्यात आला असून, या वर्षी “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” या घोषवाक्याने अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. या अभियानांतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेने खालील प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.
१) दिनांक २२/०९/२०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता मांडवी वेंगुर्ला येथे कांदळवन स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
२) दिनांक २४/०९/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता नाटककार मधुसुदन कालेलकर सभागृह वेंगुर्ला येथे स्वच्छता विषयी प्रश्नमंजूषा (पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी) अशा दोन वयोगटात आयोजित करण्यात आलेली आहे.
३) दिनांक २५/०९/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता स्वामी विवेकानंद सभागृह वेंगुर्ला येथे कच-यातून कल्पकता स्पर्धा (पहिली ते पाचवी व सहावी ते दहावी) अशा दोन वयोगटात आयोजित करण्यात आलेली आहे.
४) दिनांक २७/०९/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता शहरातील सर्व शाळानिहाय चित्रकला स्पर्धा (पहिली ते पाचवी व सहावी ते दहावी) अशा दोन वयोगटात आयोजित करण्यात आलेली आहे.
५) दिनांक २८/०९/२०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता झुलता पुल वेंगुर्ला ते नवाबाग किनारा, वेंगुर्ला येथे महास्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
६) दिनांक ०१/१०/२०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजता वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला - वेंगुर्ला दिवाणी न्यायालय – वेंगुर्ला पोलीस ठाणे - तहसील कार्यालय - नाटककार मधुसुदन कालेलकर सभागृह वेंगुर्ला या मार्गे स्वच्छता रॅली आयोजित करण्यात आलेली आहे.
वेंगुर्ला नगरपरिषदेकरीता स्वच्छता विषयक सर्व प्रकारची कामे करणा-या तसेच नगरपरिषदेस प्राप्त होणा-या विविध पुरस्कारांमध्ये महत्वाची भूमिका बजावणा-या सर्व सफाई कर्मचा-यांचा फिटनेस सुधारण्यासाठी दिनांक २९/०९/२०२४ रोजी मेजर ध्यानचंद स्टेडियम कॅम्प येथे विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आलेले आहे .
‘’भारताच्या भूमीला स्वच्छ ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे वेळ देईन व इतरांना देखील स्वच्छतेस प्रेरीत करीन’’ ही शपथ वेंगुर्ला शहरातील सर्व महीला बचत गट, सर्व शासकीय कार्यालये, सर्व शाळा व महाविद्यालये याठिकाणी घेण्यात येत आहे. दरवर्षी स्वच्छता ही सेवा (SHS) अंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments