भाजपा युवा नेते संदिप गावडे याच्या माध्यमातून वेंगुर्लेतील ४६ भजनी मंडळांना प्रोत्साहनात्मक भजन साहीत्याचे वाटप
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
भारतीय जनता पार्टी व भाजप नेते श्री.संदीप एकनाथ गावडे यांच्या मार्फत सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला या तीनही तालुक्यातील भजनी मंडळांना प्रोत्साहनपर मोफत भजनी साहित्य संच वाटप करण्यात आले . आध्यात्मिक चळवळीला बळ देण्यासाठी गावातील भजन मंडळांना स्वखर्चातून भजन साहित्य संच देण्याचे कार्य श्री. संदीप गावडे यांनी पालकमंत्री श्री. रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ केला .
वेंगुर्ले तालुक्यातील भजनी मंडळांना भाजपा तालुका कार्यालयात भजन साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . यावेळी मार्गदर्शन करताना संदिप गावडे म्हणाले कि भाजपा हा अध्यात्मिक गोष्टींशी निगडित आहे , त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासुन राज्यातील देवेंद्रजी फडणवीसां पर्यंत सर्वच नेते धार्मिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देतात . म्हणून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात स्वखर्चाने भजन साहित्य देत असल्याचे सांगीतले .
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , मच्छिमार नेते वसंत तांडेल व दादा केळुसकर , माजी सभापती प्रीतेश राऊळ , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , युवा मोर्चाचे प्रसाद पाटकर , ओबीसी सेलचे शरद मेस्त्री , शक्तिकेंद्र प्रमुख सुधीर गावडे , खानोली सरपंच सुभाष खानोलकर , बाबु भोसले , सुनिल घाग , कार्तिकी पवार तसेच बुथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते .
Post a Comment
0 Comments