Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले नगर परिषदेतर्फे स्वभाव "स्वच्छता- संस्कार स्वच्छता" अंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर संपन्न

वेंगुर्ले नगर परिषदेतर्फे स्वभाव "स्वच्छता- संस्कार स्वच्छता" अंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर संपन्न 

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी  कार्य मंत्रालय (MOHUA) भारत सरकार यांनी  स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छता पंधरवडा मार्फत  “स्वच्छता ही सेवा” (स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता ) ही मोहीम देशात दि. १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत या कालावधीत राबविण्यात येत आहे. सदर मोहिमे अंतर्गत अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्याच्या संरक्षणासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 
सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपणे ही महत्त्वाची बाब मानली जाते, कारण स्वच्छता करताना त्यांना विविध रोगराईची लागण होण्याची शक्यता असते, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो 
वेंगुर्ला नगरपरिषद, वेंगुर्ला आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबर २०२४ रोजी सफाई कर्मचाऱ्यांसाठी आपला दवाखाना, वेंगुर्ला येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात सर्व सफाई कर्मचाऱ्यांची दैनंदिन आरोग्य तपासणी, रक्ताच्या विविध चाचण्या, आणि इतर आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार औषधे देण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांसाठी अशा प्रकारची आरोग्य तपासणी शिबिरे नियमितपणे आयोजित करण्यात येतील, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याची चांगली काळजी घेतली जाऊ शकते असे मनोगत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी व्‍यक्‍त केले. 
त्याचप्रमाणे दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी सफाई कर्मचाऱ्यांसाठी वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना (PMSBY), प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, आणि आयुष्यमान भारत कार्ड यांसारख्या योजनांचा लाभ देण्यात आला आहे. याशिवाय इतर शासकीय योजनांची माहिती देखील कर्मचाऱ्यांना देण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या कल्याणाची आणि सुरक्षिततेची काळजी घेणे शक्य होणारे आहे. 
सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्याच्या संरक्षणासाठी दिनांक २०  सप्टेंबर २०२४ रोजी सुरक्षा उपकरणे (PPE Kit) आणि ओळखपत्रे (ID Card) वाटप करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा उपकरणांचा वापर कसा करावा आणि आरोग्य विम्याचे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेण्यास मदत होणार आहे.

Post a Comment

0 Comments