मुख्याध्यापक गावडे यांच्याकडे उभादांडा शाळा नं.३साठीचे दोन स्मार्ट टि.व्ही.संच सुपूर्द करण्यात आले.
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
विज्ञानाची कास धरल्याशिवाय वेगवान जगाचा सामना करता येणार नाही. त्यासाठी जगाशी सतत संपर्कात राहणे गरजेचे आहे. तुमच्या डिजिटल शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी स्मार्ट टि.व्ही.संच शाळेला भेट देण्यात आले असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश चमणकर यांनी केले.
वरचेमाड भंडारी मंडळ, मुंबईतर्फे उभादांडा नं.३ या शाळेला दोन स्मार्ट टि.व्ही.संच भेट देण्यात आले. तसेच सीए सुधीर गवंडी यांच्यातर्फे वरचेमाड भंडारी मंडळाकडे दोन लाख रूपयांची शिक्षण बचत ठेव ठेवण्यात आली आहे. त्याच्या वार्षिक व्याजातून शाळेतील ५३ही विद्यार्थ्यांना कै.सौ.सुनंदा सुभाष गवंडी हिच्या स्मरणार्थ पिण्याच्या पाण्यासाठी स्टील बॉटल, कंपास बॉक्स व लहान मुलांना शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. यावेळी किशोर तुळसकर, शशिकांत चमणकर, दादा साळगांवकर, जनार्दन चोपडेकर, पोलिस पाटील विजय नार्वेकर, अमेरिकास्थित शाळेच्या माजी विद्यार्थीनी मुग्धा चमणकर, ऐश्वर्या चमणकर, शेखर चोपडेकर, माया मांजरेकर, महेंद्र मातोंडकर, मुख्याध्यापिका गावडे आदी उपस्थित होते. दोन लाख रूपयांची शिक्षण बचत ठेव मिळविण्यासाठी मंडळाचे विश्वस्त रूपेश तुळसकर यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साई चोपडेकर याने विशेष मेहनत घेतली.
Post a Comment
0 Comments