श्री क्षेत्र गणपतीपुळ्यात भाद्रपदी गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
नवप्रभात NEWS / रत्नागिरी
रत्नागिरी येथील श्रीक्षेत्र गणपतीपुळे देवस्थानतर्फे ४ ते ८ सप्टेंबरला भाद्रपदी गणेशोत्सवानिमित्त श्रींच्या मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला गणेशभक्तांनी उपस्थिती राहावे, असे आवाहन श्रीदेव गणपतीपुळे संस्थानतर्फे करण्यात आले आहे. बुधवारी (ता. ४) सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळी श्रींची महापूजा व प्रसाद, दररोज सायंकाळी सात ते साडेसात या वेळेत आरती व मंत्रपुष्प, दररोज सायंकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकार रोहिणी माने-परांजपे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. गुरूवारी (ता. ५) दुपारी ११ ते १२ या वेळेत श्रींना सहस्र मोदक समर्पण, शनिवारी (ता. ७) दुपारी चार ते सहा या वेळेत श्रींची पालखी मिरवणूक प्रदक्षिणा, सायंकाळी कीर्तन, ८ ला सायंकाळी सामुदायिक आरती व मंत्रपुष्प, कीर्तन, १५ ला वामन जयंतीच्या दिवशी दुपारी साडेअकरा ते दोन या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला गणेशभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यमान पंचकमिटी सरपंच डॉ. श्रीराम केळकर, खजिनदार अमित मेहेंदळे, सचिव विद्याधर शेंड्ये, पंच डॉ. विवेक भडे, प्रा. विनायक राऊत, नीलेश
कोल्हटकर, वेदमूर्ती श्रीहरी रानडे यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments