Type Here to Get Search Results !

नारुर महालक्ष्मी मंदिरात 3 ऑक्टोबरपासून नवचंडी उत्सवविविध धार्मिक विधींसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

नारुर महालक्ष्मी मंदिरात 3 ऑक्टोबरपासून नवचंडी उत्सव
विविध धार्मिक विधींसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन 

   मनोज देसाई 
नवप्रभात NEWS 


कुडाळ तालुक्यातील नारुर येथील श्री देवी महालक्ष्मी मंदिर येथे दि. ३ ते दि.१२ ऑक्टोबर पर्यंत नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक विधींसह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
नारुरच्या महालक्ष्मी मंदिरात विविध सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात. श्रावण मासानंतर सर्वात जास्त दिवस साजरा करण्यात येणार उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव. यंदाही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दि. ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक विधी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात दि ३ रोजी सकाळी ९ वा. घटस्थापना होईल. त्यानंतर विविध धार्मिक विधी होतील. तसेच दि. 3 त दि 7 ऑक्टोबर या कालावधीत रोज सायंकाळी ७.३० वाजता ह.भ.प.श्री. मेस्त्री बुवा, कालेली यांची सुश्राव्य कीर्तने होणार आहे. यात दि 3 रोजी सायं. 7.30 वा दुर्गा - मधुकैठब वध या विषयावर कीर्तन होणार असून याचे यजमान राजेंद्र नारकर कुटुंबिय गोवा हे आहेत. 
दि. ४ रोजी कृष्ण - रुक्मिणी स्वयंवर (यजमान - दत्ताराम लाड कुटुंबिय गोवा), दि. ५ रोजी राम - रामभक्त केवट (यजमान उद्य व रामकृष्ण म्हाडेश्वर गोवा), दि. ६ रोजी संतचरित्र - संत गोरा कुंभार
(यजमान - अभिजित तेली गोवा)
दि. ७ रोजी ऐतिहासिक - अफझलखान वध (यजमान भिसे व मिशाळ कुटुंबिय गोवा) अशी कीर्तने सादर होणार आहेत.
दिनांक ८ व  ९ रोजी 
जिल्हास्तरीय महिला भजन स्पर्धा होणार अहे. या स्पर्धेत 
प्रथम क्रमांक रु.७००१/-, द्वितीय क्रमांक रु.५७७७/-, तृतीय क्रमांक रु. ३७७७/- तर उत्तेजनार्थ रु. २७७७/-
इतर वैयक्तिक बक्षिसे
आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. 
दिनांक १० रोजी सायंकाळी ७ वा. पासून श्री देवी महालक्ष्मीचा वार्षिक गोंधळ व जागरण कार्यक्रम होणार आहे. रात्री ८ वा. महाप्रसाद, दि. ११ रोजी 
सायंकाळी ७.३० वा.
स्थानिक गावातील सर्व शाळा आणि अंगणवाडीतील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम महालक्ष्मी सभामंडपात सादर होणार आहेत. दिनांक १२ रोजी 
दुपारी २ वा. सिमोल्लंघन होणार आहे. त्यानंतर रात्री 9.30 वा. 
कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री देव कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ - नेरूर यांचे  दशावतारी नाटक सादर होईल.
तरी भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी महालक्ष्मी देवस्थान चार बारा गावकर मंडळी बहुमानकरी श्री महालक्ष्मी देवस्थान स्थानिक समिती व नारुर ग्रामस्थ यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments