Type Here to Get Search Results !

सिंधुदुर्गात 25 ते 27 सप्टेंबर तीन दिवस पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार जनता दरबार.


सिंधुदुर्गात 25 ते 27 सप्टेंबर असे तीन दिवस पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार जनता दरबार.

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील समस्यांचा निपटारा लावण्याकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मागील महिन्यात ओरोस येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते.
या जनता दरबारात झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी व मागील जनता दरबारात सांगितल्याप्रमाणे या महिन्यात 25 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर असे तीन दिवस ओरोस येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सकाळी 11 वाजता जनता दरबार घेण्यात येणार आहे. 
25 सप्टेंबर रोजी कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी जनता दरबार होणार आहे. 
26 सप्टेंबर रोजी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी जनता दरबार होणार आहे. 
27 सप्टेंबर रोजी सावंतवाडी वेंगुर्ले विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी जनता दरबार होणार आहे. 
मागील महिन्यात झालेल्या जनता दरबारातील पालकमंत्र्यांनी ज्या ज्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशाप्रमाणे अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी केली की नाही हेही यावेळी पाहिले जाणार आहे. 
त्याचबरोबर नव्याने उपस्थित होणाऱ्या नागरिकांना देखील या जनता दरबारामध्ये सहभागी होता येणार आहे.

Post a Comment

0 Comments