राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत वेंगुर्ले शहरात 23 ते 30 सप्टेंबर दरम्यान लसीकरण मोहीम
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत २०२५ पर्यंत क्षयरोगतुक्त भारत अभियानांतर्गत१८ वर्षावरील बीसीजी लसीकरण सुरु करण्यात आलेले आहे.
यात पुढील व्यक्ती लसीकरणासाठी पात्र असतील.
१) क्षयरोग (मागील ५ वर्षे)
२) क्षयरुग्णाचे सहवासित (मागील ३ वर्षे)
३) BMI १८चे खाली
४) धुम्रपान करणारे व्यक्ती
५) मधुमेह असणारे व्यक्ती
६) ६० वर्षावरील वय असलेले व्यक्ती
वरील दिलेल्या पात्रता निकषानुसार वेंगुर्ला शहरातील व्यक्तीना बीसीजी लसीकरण
(१) भटवाडी शाळा नं.०२ (२) म्हाडा कॉलनी (३) वडखोल (४) कातकरी समाज (५) नगरपालिका वेंगुर्ला
(६) उपजिल्हा रुग्णालय, या ठिकाणी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत देण्यात येणार आहे.
बीसीजी लसीकरणासाठी येणा-या व्यक्तीनी कोणतेही एक ओळखपत्र येताना सोबत घेऊन येणे आवश्यक.
या लसीकरणाचा लाभ जास्तीत जास्त नागरीकानी घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदिप सावंत उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ला यांनी केले आहे
Post a Comment
0 Comments