Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात हिर्लोकच्या शिवाजी विद्यालयाने प्रथम क्रमांक प्राप्त करत 11 लाख रुपयांच्या बक्षीसाचे मानकरी ठरल्याने नारुरच्या माजी विद्यार्थी, पालकांकडून शिवाजी विद्यालयाला शुभेच्छा

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात हिर्लोकच्या शिवाजी विद्यालयाने प्रथम क्रमांक प्राप्त करत 11 लाख रुपयांच्या बक्षीसाचे मानकरी ठरल्याने नारुरच्या माजी विद्यार्थी, पालकांकडून शिवाजी विद्यालयाला शुभेच्छा 

   मनोज देसाई 
नवप्रभात NEWS 


मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा - दोन 2024 -25 या अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक गटात 234 शाळांमधून शिवाजी विद्यालय हिर्लोक हायस्कूलने प्रथम क्रमांक प्राप्त करत 11 लाख रुपयांचे बक्षीस पटकविले. 
याच पार्श्वभूमीवर नारुर गावातील पालक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी विद्यालयात जाऊन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी नारुर गावातील पालक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांनी मुख्याध्यापक दिनेश म्हडगुत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी हिर्लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उदय सावंत, कुडाळ पंचायत समितीच्या माजी सभापती नूतन आईर, रांगणा तुळसुलीचे सरपंच नागेश आईर, संस्थेचे कार्याध्यक्ष सुर्यकांत नाईक, संस्थेचे संचालक सुधाकर सावंत, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष एकनाथ सरनोबत, सदस्य सुरेश झोरे, संजय सावंत, जगदीश सरनोबत, अमित सरनोबत, किशोर सरनोबत, प्रसाद सरनोबत, सागर परब, शिक्षक  सुभाष गोविंदा विणकर, शिक्षिका स्मिता नामदेव घाडी, शिक्षक मनीष नारायण तांबे, शिक्षक अनिल दादू केळुसकर, शिक्षक केशव खंडूजी ढाकरे, शिक्षक मंगेश भागू शिंदे, शिक्षक सुशील नारायण डवर, शिक्षिका स्वरा अमोल राऊळ, शिक्षक हनुमंत लक्ष्मण नाईक, शिक्षकेतर कर्मचारी  ज्ञानेश्वर गणपत गोसावी, महादेव सहदेव जाधव पालक आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते. 
यावेळी बोलताना मुख्याध्यापक दिनेश म्हडगुत यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात जिल्हावार उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून विद्यालयाने 234 शाळांमधून प्रथम क्रमांक पटकावत 11 लाखांचे बक्षीस प्राप्त केले. गेल्या वर्षी या अभियानात या शाळेने द्वितीय क्रमांक प्राप्त करत पाच लाख रुपयांचे बक्षीस पटकाविले होते. या यशात संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले, असल्याचे सांगिताना मुख्याध्यापक दिनेश म्हडगुत भावूक झाले.
संस्थेचे अध्यक्ष उदय सावंत यांनी बोलताना सांगितले की, शाळेच्या या यशात शिक्षकांचा मोठा वाटा आहे. या स्पर्धेत गुण संख्या महत्त्वाची होती. त्यामुळे एक एक गुण कशा पद्धतीने वाढेल यासाठी शिक्षकांनी रात्री 11 वा. पर्यंत काम केले आहे. तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सावंत सुद्धा काहीसे भावूक झाले.
यावेळी माजी विद्यार्थी अमित सरनोबत, किशोर सरनोबत यांनी शिक्षकांचे अभिनंदन करताना शाळेविषयी आपले मत व्यक्त करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रम विद्यालयाच्या सभागृहात पार पडला.

Post a Comment

0 Comments