Type Here to Get Search Results !

म्हापण खालचावाडा शाळेचे मुख्याध्यापक अमर पाटील यांचे MH -SET परीक्षेत यश

म्हापण खालचावाडा शाळेचे मुख्याध्यापक अमर पाटील यांचे MH -SET परीक्षेत यश

   योगेश तांडेल
नवप्रभात NEWS 

     वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हापण खालचावाडा येथील शिक्षक श्री अमर पांडुरंग पाटील हे महाराष्ट्र शासन यांचेमार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या राज्य प्राध्यापक पात्रता परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयात त्यांनी पहिल्याच प्रयत्नात सुयश संपादन केलेले आहे.7 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्र आणि गोवा या राज्यासाठी प्राध्यापक पदासाठी  सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी राज्यभरातून लाखो विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती.सेट विभागाकडून ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता निकाल जाहीर करण्यात आला.
            श्री.अमर पाटील यांनी यापूर्वी  विद्यापीठांकडून आयोजीत करण्यात आलेल्या M.A.(English)-91%,M.A.Ed.-82%,B.Ed-94.25% गुण मिळवत आऊटस्टँडिंग ग्रेड ('ओ' श्रेणी) संपादन केली आहे.त्यांनी संगणकशास्त्राचाही विशेष अभ्यास केला आहे.
      जि.प. प्राथ.शाळा म्हापण खालचावाडा येथे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर  एक वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी शाळेचा अभूतपूर्व कायापालट केला. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments