Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल न झाल्यास वेंगुर्ले भटवाडी येथील शैलेंद्र तुळसुलकर यांचे १४ ऑगस्टपासून आमरण उपोषण..

वेंगुर्ले पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल न झाल्यास वेंगुर्ले भटवाडी येथील शैलेंद्र तुळसुलकर यांचे १४ ऑगस्टपासून आमरण उपोषण..

  योगेश तांडेल
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ला पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल न झाल्यास दिनांक १४ ऑगस्टपासून वेंगुर्ले पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा वेंगुर्ले भटवाडी येथील शैलेंद्र रमेश तुळसुलकर राहणार भटवाडी यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग,पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री मुंबई,उपअधीक्षक उपविभागीय अधिकारी सावंतवाडी,तहसिलदार वेंगुर्ले,पोलीस निरीक्षक वेंगुर्ले,मुख्याधिकारी वेंगुर्ले नगरपरिषद यांना दिल्या आहेत.
१ ऑगस्ट रोजी दिलेल्या लेखी निवेदनात शैलेंद्र तुळसुलकर यांनी असे म्हटले आहे की,वेंगुर्ले पोलीस निरीक्षकांनी आपल्याला वेंगुर्ला पोलिस स्टेशनमध्ये आलात तर आतमध्ये टाकीन,तू मला सांगणारा कोण?हे माझे पोलीस स्टेशन आहे.जास्त बोलतील तर इथेच लोळवून मारेन अशा विविध धमक्या आपल्याला दिल्या आहेत.या पोलीस निरीक्षकापासून माझ्या जिवीतास धोका निर्माण झालेला आहे.याबाबत मी आपल्या संबंधित कार्यालयाकडे रितसर अर्ज सादर केलेला होता.परंतु आजपर्यंत सदरहू पोलीस निरीक्षकावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही.सबब या पोलीस निरीक्षकावर गुन्हा नोंद होऊन योग्यती कार्यवाही न केल्यास दिनांक १४ ऑगस्ट २०२४ पासून वेंगुर्ला पोलिस स्टेशनच्या बाहेर आमरण उपोषणास बसणार आहे.सदरचे उपोषण चालू असतेवेळी काही अनुचित प्रकार घडल्यास किंवा माझ्या जिवीतास काही धोका झाल्यास त्यास सर्वस्वी आपले कार्यालय व वेंगुर्ले पोलीस निरीक्षक जबाबदार राहणार असे या निवेदनात श्री.तुळसुलकर यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments