Type Here to Get Search Results !

‘घननिळा‘ स्वरचित कवितावाचन स्पर्धेत मानसी वाईकर प्रथम

‘घननिळा‘ स्वरचित कवितावाचन स्पर्धेत मानसी वाईकर प्रथम

   योगेश तांडेल
नवप्रभात NEWS 

 शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी व शिवसेना वेंगुर्ला यांनी पुरस्कृत केलेल्य श्रावण महोत्सवांतर्गत वेंगुर्ल्यातील बॅ.खर्डेकर महाविद्यालयात घेण्यात आलेल्या ‘घननिळा‘ स्वरचित कवितावाचन स्पर्धेत वेंगुर्ला येथील मानसी वाईकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. शालेय गटात घेण्यात आलेल्या कविता वाचन स्पर्धेत स्नेहा वेंगुर्लेकर हिने तर महाविद्यालयीन गटात हर्षदा होडावडेकर हिने प्रथम क्रमांक मिळविला.

      शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था सिधुदुर्ग व बॅ.खर्डेकर महाविद्यालय यांच्यावतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले, शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव महेंद्र मातोंडकर, पत्रकार दिपेश परब, प्रा.वामन गावडे, प्रा.पी.डी.गावडे, प्रा.वसंत नंदगिरीकर, प्रा.एस.जी.चुकेवाड आदींच्या उपस्थितीत झाले.

      तीन गटात झालेल्या स्पर्धेत शालेय व महाविद्यालयीन मुलांमध्ये ‘कविता‘ या साहित्यकृतीची रूची वाढावी यासाठी पावसाळी कविता वाचनाची स्पर्धा घेण्यात आली. शालेय गटात मेघा मयेकरने द्वितीय, कस्तुरी बगेने तृतीय तर सेजल रेडकर व गजानन गावडे यांनी उत्तेजनार्थ, महाविद्यालयीन गटात मंदार नाईक याने द्वितीय तर भैरवी घाडी हिने तृतीय क्रमांक पटकाविला. खुल्या गटात स्वरचित कवितांची अट ठेवण्यात आली होती. या गटात प्रा.पी.जी.देसाई यांनी द्वितीय, प्रा.वैभव खानोलकर यांनी तृतीय तर प्रा.एस.जे.चुकेवाड व प्रा.व्ही.एस.चव्हाण यांन उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे परिक्षण प्रा.वसंत नंदगिरीकर व महेंद्र मातोंडकर यांनी केले. विजेत्या स्पर्धकांचे साहित्यिका वृंदा कांबळी यांनी अभिनंदन केले.

फोटोओळी - ‘घननिळा‘ स्वरचित कवितावाचन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Post a Comment

0 Comments