मार्गदर्शन करताना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर. बाजूला महिला पदाधिकारी मनाली परब व अन्य. दुसऱ्या छायाचित्रात नागोबा बनविणे स्पर्धेत दंग झालेली मुले.
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
मुलांच्या अंगीभूत कला कौशल्याला प्रोत्साहन देणाऱ्या स्पर्धा त्यांना पुढील आयुष्यात आत्मविश्वासानाने उभे राहण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. शिक्षणमंत्री दीपक केसरकर नेहमीच मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्सुक असतात. नागपंचमी हा वर्षभरातील सर्वात पहिला येणारा सण आहे. श्रावणमहिना हा देखील सृष्टीचा अप्रतिम सोहळा आहे. अशा वातावरणात मुलांवर निसर्ग आणि कलेचे सोपास्कार करण्यासाठी नागोबा बनविण्याची स्पर्धा उपयुक्त ठरणार आहे. स्पर्धेमध्ये मुलांनी घेतलेला सहभाग पाहून आनंद वाटला, असे प्रतिपादन यावेळी बोलताना तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांनी केले.
वेंगुर्ले येथील स्वामीनी मंडपम् येथे शाश्वत सेवा संस्था सिंधुदुर्ग या संस्थेने आयोजित केलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजरेकर व शिवसेनेच्या वेंगुर्ले शहर महिला संघटक मनाली परब यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी श्रावण महोत्सवाचे संयोजक दीपेश परब, शाश्वत सेवा संस्थेच्या अध्यक्ष मिताली मातोंडकर, शाश्वतच्या प्रतिनिधी दिव्या मांजरेकर, उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक प्रा. वैभव खानोलकर, शिवसेना वेंगुर्ले शहर संघटनेच्या महिला पदाधिकारी श्रीम, शिरोडकर उपस्थित होत्या, शाश्यतच्या अध्यक्ष मिताली मातोंडकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नागोबा बनविणे ही स्पर्धा प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा या दोन गटांमध्ये घेण्यात आली, तर नागोबा रंगविणे ही स्पर्धा बालवाडी गटासाठी घेण्यात आली. तिन्ही गटात मिळून ४३ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचे परीक्षण जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी केले. सूत्रसंचालन शाश्वत सेवा संस्थेचे सचिव महेंद्र मातोंडकर यांनी केले.
नागोबा बनविणे स्पर्धेचा सविस्तर निकाल खालील प्रमाणे आहे.
प्राथमिक शाळा गट: प्रथम काशिनाथ संतोष तेंडोलकर (केंद्रशाळा मठ नं. १), द्वितीय सहदेव शरद मेस्त्री (वेंगुर्ले शाळा नं. २), तृतीय अर्थव नित्यानंद मेस्त्री (वेंगुर्ले शाळा नं २), उत्तेजनार्थ देवेन सुंदर उडीयार (मदर तेरेसा इंग्लिश मिडियम स्कूल वेंगुर्ले) व दर्वाक टेमकर (सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल).
माध्यमिक शाळा गट: प्रथम मकरंद सुदेश वेंगुर्लेकर (रा. कृ. पाटकर हायस्कूल वेंगुर्ले), द्वितीय- प्रभाकर बाबुराव मेस्त्री (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा), तृतीय- चिन्मय रघुनाथ कुडपकर (एम. आर. देसाई इंग्लिश मिडीयम स्कूल) उत्तेजनार्थ वेदांत चंद्रशेखर म्हापणकर व भाग्येश वासुदेव जाधव (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा).
बालवाडी गट (नागोया रंगविणे स्पर्धा) प्रथम इशान सुंदर उडियार (मदर तेरेसा स्कूल), द्वितीय श्रीशा न्हानू राऊळ (ज्ञानदा शिशुवाटीका येतोरे), तृतीय- सार्थक भूषण लांजेकर (शिवाजी प्रागतिक शाळा कॅम्प वेंगुर्ले), उत्तेजनार्थ युगांश निरज उडियार व आयुष ऋषीकेश बागवे (दोन्ही एम. आर. देसाई स्कूल वेंगुर्ले),
Post a Comment
0 Comments