इको- सेन्सिटिव्ह झोन करण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेला कोकणवासी आणि प्रतिसाद द्यावा..
नवप्रभात NEWS / सावंतवाडी
सिंधुदुर्गातील १९२ गावे आणि २५ महत्वाची क्षेत्रे केंद्र सरकारने इको- सेन्सिटिव्ह झोन करण्यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली आहे त्या निर्णयाचे शेतकरी विकास संघटनेचे अध्यक्ष वसंत ऊर्फ अण्णा केसरकर यांनी स्वागत केले असून कोकणवासीयांनीही या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले आहे.
केसरकर यांनी म्हटले आहे की, या निर्णयामुळे कोकणातील पर्यावरणाचे संरक्षण होणार असून भविष्यातील आपत्तींपासून संरक्षण मिळणार आहे. गेल्या काही वर्षांत कोकणातील डोंगर आणि जंगलांवर होणाऱ्या अनियंत्रित विकासकामांमुळे पर्यावरणीय संकटे वाढली आहेत. मायनिंग प्रकल्पांमुळे डोंगरांचे निसर्गसंपन्न वातावरण नष्ट झाले आहे. यामुळे पावसाळ्यात डोंगर कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हे संकट थोपविण्यासाठी केंद्र सरकारने इको सेन्सिटिव्ह झोनची अधिसूचना काढली आहे, ज्यामध्ये १९२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये आंबोली, केसरी, असनिये, तळकट, तांबोळी यांसारख्या महत्वाच्या गावांचाही समावेश आहे. माधव गाडगीळ समितीने पश्चिम घाटाला इको- सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केले होते. परंतु, काही स्थानिक नेत्यांनी आणि मायनिंग कंपन्यांनी दिल्ली दरबारी वजन वापरून कस्तुरीरंगन समितीकडून पुन्हा सर्वेक्षण करत काही गावांना या झोनमधून वगळण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे सिंधुदुर्गातील काही भागात मायनिंगला परवानगी मिळाली आणि पर्यावरणीय संतुलन बिघडले. डोंगरांच्या निसर्गावर झालेल्या या विपरित परिणामांमुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी या नवीन इको- सेन्सिटिव्ह झोनची घोषणा स्वागतार्ह मानली आहे. वसंत केसरकर यांनी सांगितले की, या निर्णयाचे स्वागत करावे. आपल्या गावच्या भविष्याचा विचार करून या निर्णयाला समर्थन द्यावे.
Post a Comment
0 Comments