Type Here to Get Search Results !

अर्चना घारे यांनी वेधले राज्य महिला आयोगाचे लक्ष

अर्चना घारे यांनी वेधले राज्य महिला आयोगाचे लक्ष

   उमेश कुंभार 
नवप्रभात NEWS 

अल्पवयीन मुलीचे नाव लिहून माडखोल गावात  एका परजिल्ह्यातील युवकाने आत्महत्या केली होती. या प्रकरणाच्या तपासकार्याप्रसंगी संबंधित पोलिस अधिकाऱ्याने
गैरवर्तन केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. सदर प्रकरणातील अधिकारी हा बदलावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यासाठी सावंतवाडी पोलिस ठाणे येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब यांनी पाठिंबा दिला.

अर्चनाताईंनी महिला आयोग, राज्य महाराष्ट्र अध्यक्षा आदरणीय सौ. रूपालीताई चाकणकर यांच्याशी सदर घटनेविषयी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी पोलिस निरीक्षक यांच्याशी चर्चा करत आवश्यक सुचना केल्या. दरम्यान, तपासकामात अधिकारी बदलण्याच्या ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार कार्यवाहीचे आश्वासन पोलिस निरीक्षक श्री. अमोल यांनी दिले. त्यामुळे हे आंदोलन तुर्तास थांबविले. महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. अशावेळी महिलांना होणारा त्रास याची दक्षता घेत, जबाबदारीने हे प्रकरण हाताळावे अशी विनंती पोलिस निरीक्षक यांना अर्चनाताई यांनी केली.

यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तालुकाध्यक्ष श्री. पुंडलिक दळवी,राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा अँड. सौ.सायली दुभाषी, शहराध्यक्ष श्री. देवेंद्र टेमकर,श्री‌. हिदायतुल्ला खान, सौ. सोनाली परब, श्री.राजकुमार राऊळ, श्री.संजय लाड, श्री.संतोष राऊळ, श्री.संदीप सुकी, श्री.संतोष राणे, श्री.विशाल राऊळ, श्री.मनोज घाटकर,श्री‌. सत्यवान बंड, श्री‌.प्रमोद बंड,श्री. उल्हास राणे तसेच माडखोल  ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments