सावंतवाडी राजे प्रतिष्ठान कामगार सेना. व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्यने केला निषेध.
नवप्रभात NEWS / सावंतवाडी
सिंधुदुर्ग किल्ल्यावर केवळ ९ महिन्यांपूर्वी उभे केलेले छत्रपती शिवरायांचा पुतळा काल सोमवार रोजी अचानक कोसळतो. ही बाब खेदजनक असून या बांधकामातील दोषी असणाऱ्यांवर प्रत्येकावर कठोर कडक कारवाई करावी, अशी मागणी आज सावंतवाडी राजे प्रतिष्ठान कामगार सेना. राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य.वतीने प्रसिद्धी पत्रकार द्वारे केली आहे.
मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेल्या पुतळ्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे झाल्यामुळे तो कोसळला आहे याला सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित अधिकारी व त्याचे काम करणाऱ्या व्यक्तींची जबाबदारी आहे. त्यामुळे या दिवशी आढळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कठोर कारवाई करावीअशी मागणी, राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य. वतीने करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर. उपाध्यक्ष मंगेश माणगावकर. सचिव रामचंद्र कुडाळकर. खजिनदार मंगेश माणगावकर. जिल्हा संपर्क प्रमुख शिवा गावडे खजिनदार ज्ञानेश्वर पारधी.,जिल्हा महिला अध्यक्ष पूजा गावडे. तालुकाध्यक्ष संजय गावडे. तालुकाध्यक्ष संचिता गावडे. सावंतवाडी शहराध्यक्ष सेजल पेडणेकर उपाध्यक्ष संगीता पारधी. किरण शिर्के समीक्षा मोघे. रवींद्र मोघे. अंकिता माळकर. अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण राजकोट येते उभारला होता. महनीय व्यक्तींच्या हस्ते येथे लोकार्पण करण्यात आले होते. विवध प्रकारचे पडसाद उमटत आहेत. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करा अशी मागणी होत आहे.
Post a Comment
0 Comments