Type Here to Get Search Results !

सचिन पालव यांना ‘वेंगुर्ला संगीतभूषण‘ पुरस्काराने सन्मानीत

सचिन पालव यांना ‘वेंगुर्ला संगीतभूषण‘ पुरस्काराने सन्मानीत

   योगेश तांडेल
नवप्रभात NEWS 

जन्मतः अंध असूनही संगीत क्षेत्रात विशारद झालेल्या वडखोल येथील सचिन पालव यांना शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते ‘वेंगुर्ला संगीतभूषण पुरस्कार‘ देऊन सन्मानीत करण्यात आले. हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम २५ ऑगस्ट रोजी रामेश्वर मंदिरात झालेल्या खुल्या शिवमहिमा गायन स्पर्धेवेळी संपन्न झाला.

      सचिन पालव हे संपूर्णपणे दृष्टीहिन असूनही त्यांनी आपल्या दिव्यांगावर मात करीत संगीत क्षेत्रातील तीन महत्त्वाच्या पदव्या संपादन केल्या आहेत. त्यांनी हार्मोनियम वादन, तबला वादन व गायनामध्येही संगीत विशारद पदवी प्राप्त केली आहे. कमी वयात मिळविलेले हे यश आदर्श निर्माण करणारे आहे. याची दखल घेऊन सचिन पालव यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, भजनसम्राट भालचंद्र केळुसकर, संगीत अलंकार अनघा गोगटे, रामेश्वर मंदिराचे मानकरी सुनिल परब, संजय परब, संवादिनी वादक गजानन मेस्त्री, शाश्वत बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मिताली मातोंडकर, संगीत विशारद सचिन पालव, भालचंद्र पालव आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments