Type Here to Get Search Results !

शासकीय वसतिगृहात ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ

शासकीय वसतिगृहात ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ

ओरोस / प्रतिनिधी 

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयांतर्गत मागासवर्गीय मुला, मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये २०२४-२५ करिता प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास १६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती समाजकल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे.

सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयांतर्गत मुला-मुलींच्या शासकीय डॉ. बाबासाहेब वसतिगृहाकरिता आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली व वेंगुर्ला अशा तीन ठिकाणी तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला व देवगड असे ५ ठिकाणी आहेत. या आठ शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनींना २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध झालेली आहे. शासकीय वसतिगृहात विनामूल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम व इंटरनेट वाय-फाय आदी सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात. गरजू विद्यार्थ्यांनी https:// hmas.mahait.org या पोर्टलवर प्रवेश अर्जाची नोंदणी करावी व प्रिंट घेऊन वसतिगृहातील गृहपालांकडे कागदपत्रांसह जमा करावेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहाचे गृहपाल वा सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय (०२३६२- २२८८८२) ये येथे संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments