Type Here to Get Search Results !

वारंवार खंडित वीजपुरवठ्यामुळे नारुरवासीय त्रस्त आक्रमक ग्रामस्थांनी वीज अधिकाऱ्यांना निवेदन सादर करुन वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

आक्रमक ग्रामस्थांनी वीज अधिकाऱ्यांना निवेदन सादर करुन वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा दिला इशारा 

नवप्रभात NEWS / कुडाळ 

मागच्या अनेक दिवसांपासून नारुर गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
याच पार्श्वभूमीवर काल नारुर ग्रामस्थांनी ओरोस येथील वीज खात्याचे उप अभियंता राजेंद्र कामथे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. तसेच वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.
सदर निवेदन नारुर ग्रामस्थांच्यावतीने यावेळी नारुरचे उपसरपंच मुकुंद सरनोबत, ग्रामपंचायत सदस्य विजय मयेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य जगदीश सरनोबत, एकनाथ सरनोबत, किशोर सरनोबत यांनी दिले.
नारुर गावात मागच्या अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांनसह विद्यार्थी, कामगारवर्ग यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक महत्त्वाची दैनंदिन कामे रखडली आहेत. तसेच धान्य दळण गिरण बंद असल्याने महिलावर्ग त्रस्त आहे. यासोबतच वाज नसल्याचा सर्वात मोठा फटका गणेशमूर्ती चित्र शाळांना बसत आहे. चतुर्थीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. गणेशमूर्ती चित्र शाळांमध्येही गणेशमूर्ती रंग काम सुरू झाले आहे. गावात चार गणेशमूर्ती चित्रशाळा असून विजेअभावी गणेशमूर्तींचे काम रखडले आहे. वीज नसल्याने काम पूर्ण करताना अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आक्रमक झाले असून काल ओरोस येथील वीज खात्याच्या कार्यालयात धडक दिली. त्या ठिकाणी असणारे अधिकारी वीज उप अभियंता राजेंद्र कामथे यांना निवेदन सादर करून तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. यावेळी नारुरचे उपसरपंच मुकुंद सरनोबत, ग्रामपंचायत सदस्य विजय मयेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य जगदीश सरनोबत, एकनाथ सरनोबत, किशोर सरनोबत उपस्थित होते. 
यावेळी तीस ग्रामस्थांच्या सहीचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी उप अभियंता राजेंद्र कामथे यांनी तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली. 
कायमस्वरूपी वायरमन द्या सध्या नारुर गावात कार्यरत असलेला वायरमन हा कंत्राटी कामगार असून त्याच्याजवळ पाच गावांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे एक वायरमन पाच गावांसाठी पूर्ण वेळ कसा देईल हा खरा प्रश्न आहे. 

कमी वेतन
वीज विभागात सध्या कंत्राटी कामगार (वायरमन) काम करीत आहेत. या कामगारांना अत्यल्प वेतन देण्यात येत आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेसंदर्भातही कोणतेही धोरण आखण्यात आलेले नाही. तरीही हे कामगार धोका पत्करून काम करताना दिसत आहेत.
वीज उपकेंद्र पणदूरच्या अभियंत्यांचे दुर्लक्ष 
नारुर गाव हा पणदूर वीज उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात येतो. गावात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तेथील अभियंत्यांशी संपर्क साधला असता होत नाही. आणि तक्रार केली तरी त्याची दखल घेतली जात नाही. तरी वीज विभागाच्या वरिष्ठांनी दखल घ्यावी,  अशी मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments