Type Here to Get Search Results !

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक परदेश दौरा करून काय साध्य करणार ? परशुराम उपरकर

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक परदेश दौरा करून काय साध्य करणार ? परशुराम उपरकर

नवप्रभात NEWS / कणकवली 

सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालकांच्या परदेश दौऱ्यासाठी सुरुवातीला अपुऱ्या माहितीच्या आधारे तिकिटे काढण्यात आली. व्हिसा नसल्याने यात ११ लाख ८४ हजार रुपये वाया गेले. नंतर झालेल्या बैठकीत संचालकांमध्ये वादावादी झाली व पुन्हा तिकिटे काढण्यात आली. जनतेच्या पैशाची अशी किती उधळपट्टी केली जाणार? असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे. सुरुवातीला ज्या संचालकांचा व्हिसा नाही, अशा संचालकांचीही तिकिटे काढण्यात आली. तिकीट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता ही न करता काढण्यात आलेल्या तिकिटांमुळे जिल्हा बँकेचे ११ लाख ८४ हजार

रुपये वाया गेले. ज्यांना तिकिटे

काढण्याबाबतची प्रोसिजर माहिती नाही, असे संचालक परदेश दौरा करून नेमके काय साध्य करणार आहेत? स्वित्झरलँडमध्ये बर्फातील शेती पाहायला गेलेत का, असा सवालही करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने जिल्हा बँकेकडून सर्वसामान्य नागरिकांच्या पैशाची कशी उधळपट्टी केली जाते हे समोर आले आहे. सुरुवातीला काढलेली तिकिटे रद्द करावी लागल्यानंतर २२ जुलैला झालेल्या बैठकीत मोठी वादावादी झाली आणि या वादावादीनंतर पुन्हा तिकिटे काढण्यात आली. त्यामुळे हा दौरा केवळ पर्यटन असून त्यातून जिल्हा बँक किंवा जनतेला कोणताही फायदा होणार नाही. परदेश दौऱ्यावर गेलेल्या या संचालकांना तेथे जाऊन जिल्हा बँकेच्या हितासाठीचे काय समजणार आहे, असा सवालही उपरकर यांनी पत्रकातून केला आहे.

Post a Comment

0 Comments