ग्रामसेवक दाखल्यावर सही करत नसल्यानेकामगार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
नवप्रभात NEWS / ओरोस
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतमधून बांधकाम कामगार यांच्या नोंदणी व नूतनीकरण करण्यासाठी लागणाऱ्या दाखल्यावर ग्रामसेवक सही देत नसल्यामुळे कामगार संघटनांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बुधवारी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
यावेळी श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, निवारा कामगार संघटना अध्यक्ष मंगेश चव्हाण, रत्नसिंधू कामगार संघटना अध्यक्ष अशोक बोवलेकर व सर्व तालुक्यांतून आलेले कामगार प्रतिनिधी
यांच्या समवेत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. याचवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्काळ दखल घेऊन कामगार अधिकारी, तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी, कुडाळ गटविकास अधिकारी व ग्रामसेवक युनियन यांच्यासोबत चर्चा ही करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांनी तत्काळ निवेदनावर अभिप्राय देऊन लवकरच मार्ग काढू, असे आश्वासित केले.
तसेच ग्रामसेवक राज्य संघटना यांनी निवेदन दिल्याने सर्वच जिल्ह्यात कामगार यांना अडचणी होत आहेत. मंत्रालयीन वरिष्ठ पातळीवरील सदर विषय असल्याने श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी ग्रामसेवक सही देत नसल्यामुळे कामगार यांना होत असलेल्या त्रासामुळे दोन दिवसांत महाराष्ट्र शासन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश खाडे व सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची सर्व संघटना यांच्या समवेत भेट घेण्यात येणार आहे. यातून लवकरच मार्ग काढण्यात येणार आहे. जोपर्यंत कामगार वर्गाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत कामगार वर्गासाठी श्रमिक कामगार संघटनेमार्फत पाठपुरावा सुरू ठेवण्यात येणार आहे.
Post a Comment
0 Comments