राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धेत उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलचे यश
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर मित्र मंडळ आणि शाश्वत बहुउद्देशीय संस्था आयोजित श्रावणधारा महोत्सवात गोकुळाष्टमीचे औचित्य साधून तालुकास्तरीय राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धेचे आयोजन वेंगुर्ले नगर वाचनालय वेंगुर्ले येथे करण्यात आले होते
या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा हायस्कूल घ्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळवत आपला यशाचा आलेख उंचावला या स्पर्धेत इयत्ता दहावीची महिमा रूपेश नार्वेकर हिने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तर व्दितीय क्रमांक नववीतील लावण्या प्रमोद पेडणेकर तर तृतीय क्रमांक नैतिक कृष्णकांत नाईक यांनी साकारलेले कृष्ण या वेशभुषेला मिळाला.
तर उत्तेजनार्थ क्रमांक अनुक्रमे युगा महेंद्र मातोंडकर आणि सेजल अनिल साळगावकर हिने मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे लिपिक अजित केरकर आणि प्रा वैभव खानोलकर या सह इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले.
न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा हायस्कूलच्या या
यशस्वी विद्यार्थ्यांना विजेता विद्यार्थ्यांना रोख रूपये , सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ले हायस्कूलचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, संस्था अध्यक्ष विरेंद्र आडारकर कामत, सचिव जेष्ठ रांगोळीकार रमेश नरसुले, उपाध्यक्ष निवृत्त गट शिक्षणाधिकारी रमेश पिगुळकर, निलेश मांजरेकर , राधाकृष्ण मांजरेकर, सुनिल परब आणि सर्व पदाधिकारी यांनी या स्पर्धेचे विजेते ठरलेले विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी या बरोबरच विद्यार्थ्यांचे पालकाचे ही विशेष अभिनंदन केले असुन विविध स्तरांवर या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या प्रशालेचे विशेष कौतुक केले जात आहे.
Post a Comment
0 Comments