मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवात मिळाले प्रथम पारितोषिक
नवप्रभात NEWS / कुडाळ
तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव आणि पाककला स्पर्धा बुधवार, 28 ऑगस्ट रोजी झरेबांबर येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. वनस्पतींच्या उपयोगाला प्रोत्साहन देणाऱ्या या वार्षिक कार्यक्रमाला विविध व्यक्ती आणि महिला बचत गटांचा उत्साही सहभाग लाभला.
हॉर्टिकल्चर कॉलेज, मुळदे येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पाककला स्पर्धेत स्टीम आणि फ्राईड बांबू मोमोज आणि समोसे तयार करून विशेष कामगिरी केली. बांबू या पौष्टिक आणि बहुगुणी घटकाचा कल्पकतेने वापर करून त्यांनी परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या स्वादिष्ट आणि सर्जनशीलपणे सादर केलेल्या पदार्थामुळे त्यांना स्पर्धेत प्रतिष्ठेचे पहिले पारितोषिक मिळाले.
या गटामध्ये उद्यानविद्या महाविद्यालय , मुळदे चे विद्यार्थी कु. साहिल दुबळे, मोहमंद फहिर, प्रणव सिदनकर, प्रतिक खेडकर, मंथन जाधव, अनिकेत तांबे यांचा सहभाग होता.
Post a Comment
0 Comments