Type Here to Get Search Results !

शिरगावच्या पुंडलिक कर्ले चे मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात यश महाविद्यालयाने घेतला १३ प्रकारांत सहभाग

शिरगावच्या पुंडलिक कर्ले चे मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात यश
महाविद्यालयाने घेतला १३ प्रकारांत सहभाग

नवप्रभात NEWS / कणकवली

मुंबई विद्यापीठाच्या ५७ व्या सांस्कृतिक युवा महोत्सवाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झोनल राऊंडचे आयोजन यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी सावंतवाडी येथे सोमवारी करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३६ महाविद्यालयांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला होता. त्यात पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय शिरगाव यांनी सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये विविध १३ प्रकारांत सहभागी होत यश संपादन केले.
थिएटर कला मुक अभिनय स्पर्धा प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला असून या संघात सुहास प्रसाद कदम, सौमित्र नित्यानंद कदम, पंकज श्रीधर लाड, मनिष महेंद्र शिरगांवकर, वैभव दत्ताराम झाजम, मुकेश सुधीर जाधव हे विद्यार्थी सहभागी होते. याकरिता शेखर मुळये यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
तर फाईन आर्ट मधील मेहंदी या प्रकारात नेहा सत्यवान पवार हिने उत्तेजनार्थ व वक्तृत्व ग्रुप बी हिंदीमध्ये सुमन दिलीप चव्हाण हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. या सर्व विद्यार्थ्यांची मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष अरूण कर्ले, महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम तसेच सर्व संस्था पदाधिकारी, प्राचार्य समीर तारी आणि सर्व प्राध्यापक वर्ग यांनी अभिनंदन केले

Post a Comment

0 Comments