Type Here to Get Search Results !

खातेदारांकडून वसूल केलेली रक्कम रुपये 6 लाख 57 हजार 443 शासनाकडे जमा न करणाऱ्या ओरोस बुद्रुक तलाठी यांचेवर निलंबनाची कारवाई...

खातेदारांकडून वसूल केलेली रक्कम रुपये 6 लाख 57 हजार 443 शासनाकडे जमा न करणाऱ्या ओरोस बुद्रुक तलाठी यांचेवर निलंबनाची कारवाई...

नवप्रभात NEWS / ओरोस

 महसूल सप्ताह सुरु असतानाच कुडाळ तालुक्यातील ओरोस बुद्रुक तलाठी एस. एम. अरखराव यांच्यावर शासकीय रक्कम शासकीय खजिन्यात भरणा न केल्याच्या कारणामुळे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 च्या नियम (4) च्या पोट नियम (9) खंड अ च्या तरतूदी नुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई कुडाळ उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी केली आहे.

ओरोस बुद्धक तलाठी यांच्यावर 7 जुलै 2024 रोजी कुडाळ तालुक्यात ओरोस येथे आलेल्या पुरावेळी उपस्थित न राहिल्याने तसेच एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत खातेदारांकडून वसूल केलेली रक्कम रुपये 6 लाख 57 हजार 443 शासकीय खजिन्यात भरना न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

तलाठी एस. एम. अरखराव यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 च्या तरतुदीनुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात आली आहे, तसेच अतिरिक्त कार्यभार असलेल्या सझा वर्दे डिंगस आवळेगाव या गावातील शासकीय रकमेसंदर्भात तलाठी एस एम अरखराव यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिल नियम 1979. च्या नियम (4) च्या पोट नियम (9) च्या खंड तरतुदीनुसार 6 जुलै 2024 पासून पुढील आदेशापर्यंत निलंबन करण्यात आले आहे, तर या कालावधीत तलाठी एस एम अरखराव यांचे मुख्यालय

मालवण असणार आहे व ते तहसीलदार यांच्या परवानगीशिवाय सोडता येणार नाही असेही या आदेशात
म्हटले आहे. उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी मंगळवारी संध्याकाळी उशिरा हा आदेश दिला आहे.

Post a Comment

0 Comments