Type Here to Get Search Results !

कला क्रीडा सांस्कृतिक संस्कारांसाठी जागृतोसत्वाची गरज.. सचिन वालावलकर

उदघाट्नप्रसंगी बोलताना सचिन वालावलकर. बाजूला शेखर सामंत, अशोक दळवी, सुनील डुबळे, नितीन मांजरेकर, उमेश येरम, नीता कविटकर व इतर मान्यवर.

सचिन वालावलकर यांचे प्रतिपादन : वेंगुर्ल्यात शाश्वत कला क्रीडा जागृतोत्सवाचे उदघाट्न

  योगेश तांडेल / वेंगुर्ले 

जागृती कला-क्रीडा मंडळाच्या माध्यमातून संजय मालवणकर यांनी उभी केलेली चळवळ त्यांचे शिष्य पुढे घेऊन चालले आहेत ही बाब आश्वासक आहे. मुलांमध्ये कला, क्रीडा, सांस्कृतिक संस्कार घडविण्यासाठी अशा प्रकारच्या महोत्सवांची नितांत गरज आहे. गरज ओळखून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांनी या महोत्सवाला सहकार्य केले आहे. याही पुढे अशा प्रकारच्या उपक्रमांना आमचे सहकार्य राहील, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक तथा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ले येथे केले.
    दीपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी व शिवसेना वेंगुर्ला पुरस्कृत शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था सिंधुदुर्ग व वेंगुर्ले येथील जागृती कला क्रीडा मंडळ यांनी आयोजित केलेल्या शाश्वत कला क्रीडा जागृतोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. वेंगुर्ले येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात झालेल्या या जागृतोत्सवास प्रमुख अतिथी म्हणून दैनिक तरुण भारत संवादचे सिंधुदुर्ग रत्नागिरी संपादक शेखर सामंत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक सुनील डुबळे, शिवसेनेचे वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम, दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचे गजानन नाटेकर, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख ऍड. नीता कविटकर, वेंगुर्ले तालुका महिला आघाडी प्रमुख ऍड. श्रद्धा बाविस्कर, वेंगुर्ले तालुका अल्पसंख्यांक महिला आघाडी प्रमुख शबाना शेख, युवासेना वेंगुर्ले शहर प्रमुख संतोष परब, जागृतीचे अध्यक्ष दिलीप मालवणकर, तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप सावंत, शाश्वत सेवा संस्थेचे खजिनदार राजकुमार चव्हाण, श्याम कौलगेकर, मनिष दळवी, कविता राऊळ, मनाली कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
बालवाडीपासून ते दहावीपर्यंचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी आयोजित केलेल्या विविध प्रकारच्या स्पर्धाचा सामावेश असलेल्या या जागृतोत्सवाचे उदघाट्न संजय मालवणकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्व्लन करून करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत जागृतीचे अध्यक्ष दिलीप मालवणकर, शाश्वत सेवा संस्थेचे सचिव महेंद्र मातोंडकर व पदाधिकाऱ्यांनी केले. 

मंदावलेली चळवळ सक्रिय झाल्याचा आनंद - शेखर सामंत
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना तरुण भारत संवादचे संपादक शेखर सामंत म्हणाले की, जागृती मंडळाशी वेंगुर्ल्याची नाळ अगदी घट्ट जुळलेली आहे. मुलांमध्ये कला व क्रीडा गुण विकसित करण्याच्या ध्येय्याने झपाटलेल्या संजय मालवणकर यांच्या कार्याला तोड नाही. आपणही जागृतीच्या उत्कर्षाच्या काळात अनेक खेळाडू घडविण्यासाठी संजयसोबत झटलो आहे. जागृतीने अनेक खेळाडू आणि कलाकारही घडविले, मात्र संजय मालवणकर यांच्या अकाली निधनानंतर वेंगुर्ल्याची कला क्रीडा चळवळ मंदावली. ही चळवळ आता पुन्हा सक्रिय होत असल्याचा मनस्वी आनंद आहे.
     माजी नगरध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा संघटक सुनील डुबळे यांनीही संजय मालवणकर यांच्या प्रती आदरांजली व्यक्त करून अनेक आठवणी जीवन्त केल्या. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोक दळवी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक महेंद्र मातोंडकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर यांनी केले. 


🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS 
 
     बातम्यां आणि फोटोसाठी    
           व्हाट्सअप नंबर
           9552296922       
   
          📝📝📝📝

🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व   
          गोव्यातील बातम्या
             एकाच ठिकाणी 
                                          
                🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️ विविध जाहिरातींसाठी  
            'नवप्रभात पब्लिसिटी'      
                9552296922

Post a Comment

0 Comments