सांगली मधील शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम मधील मुख्याध्यापक शिक्षक केंद्रप्रमुख यांची पाट हायस्कूलला क्षेत्रभेट
कुडाळ / प्रतिनिधी
कामेरी तालुका वाळवा जिल्हा सांगली मधील शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम मधील मुख्याध्यापक शिक्षक केंद्रप्रमुख यांची पाट हायस्कूलला क्षेत्रभेट यामध्ये पाट हायस्कूलमध्ये चाललेल्या विविध उपक्रम पाहण्यासाठी भेट दिली.
यावेळी या सर्वांचे नृत्य गायनाने त्यांचे स्वागत करण्यात आले. कला अकादमी मधील विविध उपक्रमांची माहिती कला शिक्षक संदीप साळसकर यांच्याकडून जाणून घेतली. तसेच स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांमध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती विनायक कांबळे यांनी दिली तर क्रीडा विषयक विविध उपक्रम स्पर्धा यांची माहिती राजन हंजनकर, क्रीडाशिक्षक यांनी दिली शालेय परिसर शिष्यवृत्ती परीक्षा एनएमएमएस परीक्षा यांची माहिती जाणून घेतली. मुख्याध्यापक शामराव कोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले यामध्ये त्यांनी विद्यालयातील विविध उपक्रम समजावून सांगितले. यावेळी मनोगत व्यक्त करताना सर्वच उपक्रमांचे प्रशिक्षणार्थीनी कौतुक केले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध उपक्रम राबविणारी शाळा असे गौरवौद्गार शिक्षणाधिकारी प्रदिप कुमार कुडाळकर यांनी काढले शाळेच्या विविध गुणवंतांचे व शिक्षकांचेही कौतुक केले यावेळी आभार राजन हंजनकर पर्यवेक्षक यांनी मांडले.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS
बातम्यां आणि फोटोसाठी
व्हाट्सअप नंबर
9552296922
📝📝📝📝
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व
गोव्यातील बातम्या
एकाच ठिकाणी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️ विविध जाहिरातींसाठी
'नवप्रभात पब्लिसिटी'
9552296922
Post a Comment
0 Comments