राज्यस्तरीय तंबाखू जनजागृती निबंध स्पर्धेत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या सौ अदिती कशेळीकर यांचे यश
सावंतवाडी / प्रतिनिधी
टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या राष्ट्रीय तंबाखू मुक्ती केंद्रा मार्फत घेण्यात आलेल्या तंबाखू जनजागृती वरील राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील एन. सी.डी. समुपदेशक सौ. अदिती अभिषेक कशेळीकर यांनी राज्यात चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तंबाखू जनजागृती वर टाटा मेमोरियल हॉस्पिटल च्या राष्ट्रीय तंबाखू मुक्ती केंद्रामार्फत राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून शिक्षण विभाग,आरोग्य विभाग आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल मधील कर्मचारी यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
सुमारे २०० स्पर्धकातून उप-जिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील एन. सी.डी. समुपदेशक सौ. अदिती अभिषेक कशेळीकर यांनी चतुर्थ पारितोषिक पटकावला आहे. त्याना मानचिन्ह आणि पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे.
त्यांनी सादर केलेल्या निबंधामध्ये विद्यार्थी, तरुण वर्गा मध्ये तंबाखूजन्य अंमली पदार्थ ची वाढती व्यसनाधीनता याची कारणे, तसेच योग्य वेळेत शाळा व महाविद्यालातर्फे तंबाखूजन्य पदार्थांच्या मुळे होणाऱ्या आजारांची माहिती, व तंबाखविरोधी जनजागृती कार्यक्रम व व्यसनाधीन झालेल्या मुलांना योग्य समुपदेशन करून, ह्या गंभीर परिस्थितीला कसा आळा घालता येईल या विषयी प्रभावीपणे मत मांडले. यासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर एवाळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुबोच इंगळे तसेच जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ श्रीपाद पाटील यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
-------------------------------------------------------------------
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण, दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ,शिरोडा,बांदा, कसाल, ओरोस, येथे
प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातील वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments