भाजपा लोकसभा निवडणूकप्रमुख प्रमोद जठार यांची टीका;उद्धव ठाकरेंनी आधी स्वतःच्या कुटुंबाशी संवाद साधावा
कणकवली / पंढरीनाथ गुरव
शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा म्हणजे कुटुंब संवाद नावाचा फिरते थिएटर झाले.उद्धव ठाकरे यांचा कुटुंबात संवाद नाहीय, त्यांचा स्वतःचा सखा भाऊ सोबत राहत नाही, वडिलोपार्जित मातोश्री च्या प्रॉपर्टी मध्ये इंचभर जागा त्यांनी सख्या भावाला दिली नाही.त्यांनी राजकारणातून प्रगल्भ असणाऱ्या राज ठाकरे ना बाजूला केलेल्या औरंगजेबी वृत्तीने वागणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आधी स्वतःच्या कुटुंबाशी संवाद साधावा. जे बाळासाहेबांनी आयुष्यभर कमावले ते उद्धव यांनी सत्तेच्या मोहापायी गमावले असल्याची टीका भाजपा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांनी केली.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी महिला मोर्चा प्रदेश महामंत्री डॉ. मंजुषा कुदरिमोती, प्रदेश सचिव माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, प्रसाद जाधव, डामरे माजी सरपंच बबलू सावंत आदी उपस्थित होते.
शिवसेनेतून बाहेर पडलेल्या गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे यांचा एकमेव विरोधक उद्धव ठाकरे यांची सत्तेच्या लालसेची वृत्ती होती. बाळासाहेबांनी धरावे म्हटले तर उद्धव यांनी मारावे म्हणत ध चा मा केला . औरंगजेबी वृत्तीच्या उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेल्या आनंदीबाई असा रश्मी ठाकरे यांचा उल्लेख करत ठाकरे पती पत्नीवर टीका प्रमोद जठार यांनी केली.
उद्धव ठाकरे यांच्या सत्तेच्या लालसी वृत्तीने सत्ता गेली, पक्ष गेला, चिन्ह गेले, सोबत चे सहकारी सुद्धा साथ सोडून गेले. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ठाकरे साफ हरणार आहे. म्हणून भाजपा नेत्यांवर टीका करायची, शिव्या द्यायच्या आणि राडे दहशतवाद घडवून आणायचे षडयंत्र ठाकरे यांचे आहे. त्याचा पहिला अंक तळकोकणात ठाकरेंनी केला.सभेतील भास्कर जाधव यांच्या भाषणातून नेमकं गांजा मारून कोण आलं होते हे जनतेने बघितले. भास्कर जाधव आपल्या भाषणातून वैभव नाईक यांना उद्धव ठाकरे म्हणत होते , पौष महिन्याला डिसेंबर महिना म्हणत होते, त्यावरून भास्कर जाधव हे गांजा मारून भाषण करत होते. भाजपा सरकारचे जनतेला अपेक्षित असे काम केंद्र आणि राज्यात सुरू आहे. हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार अशी ठाकरे आणि विरोधकांची अवस्था येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध दरिद्री खासदार विनायक राऊत यांनी केला. ५० कोटींचा पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेला म्हणून उर फोडून रडणारे विनायक राऊत ३ लाख कोटींची गुंतवणूक असणारा, कोकणातील प्रत्येक बेरोजगराला रोजगार देणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला विनायक राऊत यांनी विरोध केला. जोपर्यंत विनायक राऊत, उद्धव ठाकरे यांच्याकडे कोकणातील खासदारकी राहील तेवढा कोकणचा विकास कधीच होणार नाही. कोकणचा विकास करायचा असेल तर विनायक राऊत आणि उद्धव ठाकरे ना अरबी समुद्रात कोकणातील बेरोजगार युवकांनी बुडवा असे आवाहन प्रमोद जठार यांनी केलं.
लाख टन पेक्षा जास्त काजूबी उत्पादन कोकण तसेच कोल्हापूर पट्ट्यात घेतले जाते. स्थानिक काजू बी ला चव चांगली असली तरी परदेशातून आयात होणाऱ्या स्वस्त काजूमुळे स्थानिक काजूबी कमी भावाने विकला जातो. काजूबी ला हमीभाव मिळत नाही तोवर गोवा सरकारच्या धर्तीवर भावांतर पद्धतीनुसार उत्पादन खर्चापेक्षा दीड पट भाव मिळावा अशी मागणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. बाजारभाव जसा असेल त्यानुसार उत्पादन खर्च पेक्षा दीड पट भाव द्यावा अशी मागणी केली आहे.काजू बी चे 70 टक्केहून अधिक उत्पादन हे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातून शेतकरी घेत आहेत. त्यामुळे काजूबी उत्पादक शेतकऱ्यांना काजूबी ला भावांतर पद्धतीनुसार भाव देण्याची राज्य सरकारकडे मागणी केली आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नवीन मंडळ कार्यालय सुरू केल्याबद्दल पालकमंत्री तसेच राज्य सरकारचे अभिनंदन करत असल्याचे श्री.जठार यांनी सांगितले .
-------------------------------------------------------------------
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS
बातम्यां आणि फोटोसाठी
व्हाट्सअप नंबर
9552296922
📝📝📝📝
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व
गोव्यातील बातम्या
एकाच ठिकाणी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️ विविध जाहिरातींसाठी
'नवप्रभात पब्लिसिटी'
9552296922
Post a Comment
0 Comments