तहसीलदार ओंकार ओतारी यांना तालुका बार असोसिएशनतर्फे निवेदन देताना ॲड. सुषमा प्रभू-खानोलकर. बाजूला अन्य. वार्ताहर नमुद केली
योगेश तांडेल / वेंगुर्ले
अहमदनगर-राहुरी येथे राहणारे व वकिली व्यवसाय करणारे दांपत्य अड. राजाराम आढाव व ॲड . मनिष आढाव यांची २५ जानेवारी रोजी निघुण हत्या करण्यात आली आहे. वकील आढाव दांम्पत्याच्या झालेल्या निघृण हत्येचा निषेध नोंदवीत सदर हत्याकांडाचा सखोल तपास होऊन सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी. त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई लवकरात लवकर व्हावी. तसेचॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट तातडीने करण्याबाबत वेंगुर्ले तालुका बारं असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष ॲड सुषमा प्रभू खानोलकर व सर्व वकिलांतर्फे तहसीलदार ओंकार ओतारी यांना निवेदन देण्यात आले. वकिलांच्या संरक्षणाकरीता ॲडव्होकेट प्रोटेक्शन तात्काळरित्या लागू करणे आता अत्यावश्यक बनलेले आहे. सदर कायद्याची अंमलबजावणी सुरु झाल्यास वकिलांच्या मनात निर्माण झालेली भीती दूर होऊन त्यांना व्यवसाय करताना संरक्षणाची हमी मिळणारी आहे. तरी प्रस्तुत वकील संरक्षण कायदा तात्काळ लागू करण्यात यावा व त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्याकरिता आपल्यामार्फत महाराष्ट्र शासनास कळविण्यात यावे, अशी मागणी वेंगुर्ले बार असोसिएशनतर्फे निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात
आहे. यावेळी . किरण पराडकर,ॲड. प्रकाश बोवलेकर, ॲड. एन. जे. गोडकर, ॲड . जी. जी. टांककर, ॲड . विलास वेंगुर्लेकर, ॲड . श्रीकृष्ण ओगले, ॲड . तेजश्री कांबळी,ॲड. संदीप परब,ॲड. मनिष सातार्डेकर,ॲड. पूनम नाईक,ॲड. सुधा केळजी,ॲड . चैतन्य दळवी,ॲड. श्वेता चमणकर, ॲड . अक्षदा राऊळ,ॲड. नविना राऊळ, ॲड . धनंजय झांटये,ॲड. तेजश्री झांटये, ॲड . आरती गावडे,ॲड. हर्षदा कुडव,ॲड. एकता धानजी,ॲड. मालवणकर, ॲड . वैदेही नरसुले,ॲड . अक्षय साळगावकर,ॲड. स्वाती भोसले उपस्थित होते.
-----------------------------------------------
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS
बातम्यां आणि फोटोसाठी
व्हाट्सअप नंबर
9552296922
📝📝📝📝
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व
गोव्यातील बातम्या
एकाच ठिकाणी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️ विविध जाहिरातींसाठी
'नवप्रभात पब्लिसिटी'
9552296922
Post a Comment
0 Comments