Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले बस स्थानक साई मंदिराचा २७ वा वर्धापन उत्सव १० व ११ फेब्रुवारीला


वेंगुर्ले बस स्थानक साई मंदिराचा २७ वा वर्धापन उत्सव

नवप्रभात NEWS / वेंगुर्ला

रा.प.वेंगुर्ला स्थानकावरील साई मंदिराचा २७वा वर्धापन उत्सव १० व ११ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.

      दि.११ रोजी सकाळी श्री गणेश पूजन व धार्मिक विधी, ९ वा.शहरातून साईंची भव्य पालखी मिरवणूक, सायं.४ वा. हळदीकुंकू, सायं.५ वा.ब्राह्मण प्रासादिक मंडळाचे (तेर्सेबांबर्डे) भजन, सायं.६ वा. मातोंड खालचे बांबर मंडळ यांचे भजन, सायं. ७ वा. महाआरती व पालखी, रात्रौ ९ वा. पार्सेकर द.ना. मंडळाचा ‘वेड्या बहिणीची वेडी माया‘ हा नाट्यप्रयोग, दि.११ रोजी महारुद्र व जप सांगता, साईबाबांची महापूजा, ११ वा.महाआरती व महानैवेद्य, दु.१२ ते ४ पर्यंत महाप्रसाद, सायं. ४ वा. श्री सिद्धेश्वर महिला मंडळाचे (खानोली) भजन, सायं. ५ वा. गुणगौरव कार्यक्रम, सायं. ७ वा. महाआरती, सायं. ७.३० वा. पालखी मिरवणूक,  रात्रौ ९ वा. देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण यांचा ‘ब्रह्म पदार्थ‘ अर्थात ‘महिमा जगन्नाथ पुरीचा‘ हा रहस्यमय ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री साई मंदिर देवस्थान समिती व कर्मचारी वृंद रा.प.वेंगुर्ला आगार यांनी केले आहे.


🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS 
 
     बातम्यां आणि फोटोसाठी    
           व्हाट्सअप नंबर
           9552296922       
   
          📝📝📝📝

🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व   
          गोव्यातील बातम्या
             एकाच ठिकाणी 
                                          
                🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️ विविध जाहिरातींसाठी  
            'नवप्रभात पब्लिसिटी'      
                9552296922

Post a Comment

0 Comments