Type Here to Get Search Results !

कालची सभा म्हणजे विनायक राऊत यांच्या निरोपाची - आ.नितेश राणे

भाजपासोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची धडपड ;नितेश राणे यांना रोखू शकत नसल्याने उबाठा नेत्यांकडून शिव्या..

कणकवली / पंढरीनाथ गुरव

कणकवली विधानसभा मतदारसंघात केलेली विकास कामे यामुळे विरोधकांकडे उमेदवार नाही.शेवटी नितेश राणे यांना रोखू शकत नसल्याने कणकवलीत सभा घेत शिव्या घालण्याचे काम भटक्या कुत्र्यांकडून झाले.मोदींच्या नेतृत्वात खासदार झालेल्या विनायक राऊत यांनी गेल्या १० वर्षात काय केलं? हे सांगता आले नाही.त्यामुळे भाजपा आणि राणे कुटुंबियांवर टीका केली.एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे भाजपा सोबत विनाअट युती करण्यासाठी प्रस्ताव उद्धव ठाकरे देत आहेत.कालची उबाठाची सभा म्हणजे विनायक राऊत यांच्या निरोपाची झाली असल्याची टीका भाजपा आ.नितेश राणे यांनी केली.

कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नितेश राणे म्हणाले,आमच्या कणकवलीत नसबंदी झालेल्या भटक्या कुत्र्यांची सभा झाली आहे.भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत चालला आहे.त्यामुळे वारंवार जिल्हा प्रशासनाला मी पत्र दिले आहे.तरीही रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला नाहक त्रास झाला.मला असंख्य लोकांचे फोन आले,नितेशजी चिडू नका.ज्यांनी ज्यांनी त्रास दिला,त्यांना उत्तर आम्ही मतदानातून देणार आहोत.महायुतीच्या माध्यमातून गावागावात विकासकामांची भूमिपूजने केली,मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे.विकास करण्यासाठी माझ्या मतदारांनी गेल्या १० वर्षापासून निवडून दिले आहे.त्यामुळे कुठल्याही पद्धतीने वातावरण खराब करायचे नाही,हे आम्ही ठरवले आहे.


उद्धव ठाकरे हे किती मोठे गद्दार आहेत,हे राज्याने पाहिले होते.त्यावेळी भाजपा सोबत युती असताना कणकवलीत माझ्या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार उभा केला.स्वतः जाहीर सभा घेतली. तरीही २०१९ मध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी झालो.ग्रामपंचायत निवडणुकीत ८० टक्के पेक्षा जास्त सरपंच भाजपाच्या विचारांचे निवडून आले आहेत .काही त्यांचे आले तेही आमच्याकडे प्रवेशासाठी वेटींगवर आहेत.तसेच काल जे स्टेजवर होते,त्यांचाही चॅनेल बदलेल.स्टेजवर काही लोक बसलेले ते आमच्याकडे वेटींग वर आहेत.माझे आणि जनतेचे अतुट नाते आहे.जो कोण विरोधी उमेदवार उभा राहील त्याच्या विरोधात मी लढणार आहे.कालच्या सभेत जिल्हा आणि राजापूरमधून लोक आणले .कोकणात बाळासाहेब ठाकरे यांची लाखोंची सभा होत होती.आता उद्धव ठाकरे कॉर्नर सभा घेत फिरत असल्याची टीका नितेश राणे यांनी केली.


विनायक राऊत यांची शेवटची निवडणूक आहे.आम्हाला कोणालाही टीका करायची नाही.आता माझ्यात संघाचे विचार आलेले आहेत.सघाच्या विचारधारा असलेली पुस्तके वाचत आहे.त्यामुळे या मतदारसंघात विकासाच्या मुद्यावर आम्ही बोलू.एका बाजूला बोलायचे राणे संपले,मग तुम्हाला बांदा ते खारेपाटण राणेंचे नाव घेतल्याशिवाय सभा होत नाही,गर्दी होत नाही, टाळ्या पडत नाही.भाजपा खोल लोकांमध्ये रुजलेला पक्ष आहेत,याचे उदाहरण कालच्या दौऱ्यात आहे.
माझ्या मतदारसंघात मी वातावरण खराब करणार नाही.या लोकसभा निवडणुकीत जो कोण उमेदवार असेल त्याच्या विजायात कणकवलीचे सिंहांचा वाटा असेल,असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.

तुम्ही तिथे जागा वाटप करत आहेत,त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायला तयार आहे.बाळासाहेब ठाकरे यांचा खरा मुलगा उद्धव ठाकरे आहे का? यांचा डीएनए तपासला पाहिजे.मी जनतेचा विकास करीत राहणार,जो काय तो त्रास द्या.भटके कुत्रे कितीही बोला. ज्याच्याकडे स्वतःचा पक्ष नाही.भाजपाने तडीपार करायची लायकी आहे का? दिशा सलियान केसचा निकाल लागल्यानंतर स्वतःच्या कुटुंब घेवून ठाकरे तडीपार होणार आहेत.भास्कर जाधव यांच्यासारखी फोंडा बाजारपेठेत माणसे भेटतात.भास्कर जाधव यांनी अनेकदा इज्जत काढली हे ठाकरे यांना कळलं नाही.हा गुणगान गातो,तो मुलाला गे बोलायचा,माझ्याकडे सांगणारे दोन तीन आमदार आहेत.ठाकरेंनी लायकी बघून मोदींवर थोड बोलावं,राजकोट किल्ला झाल्यापासून पर्यटक संख्या वाढत चालली आहे.बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीची किंमत मोदींना चांगले माहीत आहे.ठाकरे यांना किंमत माहीत आहे का? रुद्राक्ष कुठे टाकले ते सांगा,असा टोला आ.नितेश राणे यांनी लगावला.
उद्धव ठाकरे हे काल वैभव नाईक यांच्या घरी राहिले,त्यांना ठाकरे वहिनींनी नक्की विचारले असेल तुझ्याकडे एवढी संपत्ती कशी आली ?काही भाग मातोश्रीवर पोहचवले नाही का? खा.विनायक राऊत यांचे प्रगती पुस्तकं दाखवा,गेली १० वर्षे काय केलं? फक्त राणेंना बोलणं हे सभेत केलं .उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा भटक्या कुत्र्यांकरुन किती ग्रामपंचायत आल्या? त्याचा आढावा घेतला पाहिजे.जर पंतप्रधान उद्धव ठाकरे होणार असतील तर पाकिस्तानचे होतील,असा टोला आ.राणे यांनी लगावला.

-----------------------------------------------

🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS 
 
     बातम्यां आणि फोटोसाठी    
           व्हाट्सअप नंबर
           9552296922       
   
          📝📝📝📝

🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व   
          गोव्यातील बातम्या
             एकाच ठिकाणी 
                                          
                🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️ विविध जाहिरातींसाठी  
            'नवप्रभात पब्लिसिटी'      
                9552296922

Post a Comment

0 Comments