रुपेश पावसकर: मंत्री केसरकर यांच्यावर केलेल्या टीकेला दिले प्रत्युत्तर
कुडाळ / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे खरे गद्दार नसून खरे गद्दार कोण आहेत याचे उबाठा प्रमुखांनी आत्मपरीक्षण करावे, असा आरोप शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून ठाकरे यांच्यावर केला.उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता त्यांनी सावंतवाडी येथे घेतलेल्या सभेत महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना गद्दार असे संबोधून होते, याचा समाचार पावसकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून घेतला.प्रसिद्धी प्रत्रकात पावसकर यांनी म्हटले आहे.
प्रसिद्धी प्रत्रकात पावसकर यांनी म्हटले की, भाजपचे 106 आमदार व आपले 56 यांना सरकार स्थापनेसाठी जनेतेने कौल दिला असताना देखील शरद पवारांशी, सोनिया गांधींशी हातमिळवणी का केली?
शिवसेना आमदार श्री. राजन साळवी हे पाच वेळा आमदार होऊनही मंत्रिपद का नाही? आमदार वैभव नाईक हे देखील मंत्रिपदाचे दावेदार असताना आपल्या मुलाला कोणताही अनुभव नसताना चक्क
कॅबिनेट मंत्री केलात स्वतः मुख्यमंत्री झालात, मुख्यमंत्री असताना आपण मंत्रालयात किती वेळा गेलात तर मोजून 2 ते 3 वेळा आपण शरद पवारांशी हातमिळवणी करून खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, तीही स्वतःच्या स्वार्थासाठी खऱ्या अर्थाने शिवसेना ही संकटातून मुक्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री. एकनाथ शिंदे यांनी केली, धर्मवीर आनंद दिघे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार घेऊन खऱ्या अर्थाने शिंदे
सरकार विकासाचे व्हिजन घेऊन जात आहेत. दिपक केसरकर हे अभ्यासू आहेत त्यामुळेच त्यांनी चांदा ते बांदा, सिंधू रत्न, समृद्धी योजना अशा अनेक रोजगाराभिमुख योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणल्या, त्यांना जनता चौथ्यांदा नक्कीच आमदार करेल यात तीळमात्र शंका नाही. त्यामुळे खरे गद्दार कोण याचे उबाठा प्रमुखांनी आत्मपरीक्षण करावे. खुर्चीचा मोह तुम्हाला होता. त्यामुळे तुम्ही शरद पवार, सोनिया गांधी यांच्याशी हातमिळवणी करून ज्येष्ठ सदस्य यांना डावलून स्वतःच्या घरात दोन मंत्री पदे घेतलात त्यामुळे खुर्चीचा मोह कोणाला आहे हे जनतेला ज्ञात आहे. स्वार्थी कोण हे जनता ओळखून आहे. केसरकरांवर बोलण्याचा नैतिक अधिकार उबाठा प्रमुखांना नाही. तसेच वाटले उबाठा प्रमुख विकासाचे व्हिजन घेऊन बोलतील परंतु नेहमीप्रमाणे टीकात्मक बोलले. उबाठा प्रमुख यांना ज्ञात असेल की नाही माहीत नाही परंतु आपल्या कामाची वाहवा जनतेने केली पाहिजे. तसेच उबाठा प्रमुख जिथे बसले होते तिथे कार्यकर्त्यांनी डायस्ट नेऊन ठेवला तेव्हा त्यांनी आपले टीकात्मक भाषण केले.
-------------------------------------------------------------------
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS
बातम्यां आणि फोटोसाठी
व्हाट्सअप नंबर
9552296922
📝📝📝📝
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व
गोव्यातील बातम्या
एकाच ठिकाणी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️ विविध जाहिरातींसाठी
'नवप्रभात पब्लिसिटी'
9552296922
Post a Comment
0 Comments