आ.नितेश राणे यांनी नागरिकांशी संवाद साधला;फोंडा- लोरे विभागात भाजपने 'गाव चलो अभियान' ची केली सुरुवात
कणकवली / पंढरीनाथ गुरव
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डाजी यांनी जाहीर केल्यानुसार " गाव चलो अभियान" भाजपाकडून राबविण्यात येत आहे. कणकवली तालुक्यात फोंडा- लोरे विभागात भाजपने 'गाव चलो अभियान' सुरू करण्यात आले. या अभियानात आमदार नितेश राणे यांनी स्वतः सहभाग घेत प्रवासी कार्यकर्ते,नागरिकांशी संवाद साधत उत्साह वाढवला.
भाजपाचे ४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी पर्यंत देशभरात सर्व विधानसभा मतदार संघातील बूथ वर प्रवासी कार्यकर्ते प्रवास करणार आहेत.मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवली जात आहे. तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याचे काम करण्यासाठीच आमदार नितेश राणे स्वतः या अभ्यानात सहभागी झाले . सामान्य कार्यकर्ते सोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याची राणेंची कार्यपद्धती या 'गाव चलो अभियान' च्या निमित्त पुन्हा एकदा अधोरेखित झाली .
या अभियानांतर्गत बुथ सशक्तीकरण, मोदी यांनी गेल्या दहा वर्षांतील वैभवशाली कारकीर्दीतील कामांची माहीती जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमदारांनी प्रवासी कार्यकर्तेवर सोपवली.
यावेळेस प्रवासी कार्यकर्ते,विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, राजन चिके,विश्वनाथ जाधव, तसेच बबन हळदिवे, सुजाता हळदिवे, नरेश गुरव, सुमन गुरव, गजानन सावंत, अजय रावराणे, रुपेश चव्हाण, मिलींद लाड, पवन भालेकर यांसहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार नितेश राणे यांनी भिंतींवर भाजपा चे कमळ निशाणी आणि घोषवाक्य पुन्हा एकदा मोदी सरकार हे दिवार लेखन स्वतः रंगवून या विधानसभेतील फोंडा लोरे विभागात सुरवात केली. तसेच लोरे बस स्टॉप वरिल मोदी सरकारच्या नऊ वर्षांतील कारकिर्दीचा उल्लेख असलेल्या भित्तिपत्रकाचे अवलोकन करीत या उपक्रमाचे आ.नितेश राणे करीत कौतुक केले.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका पातळीवर प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments