ग्रेड परीक्षेच्या यशस्वी मुलांना पाट हायस्कूलमध्ये मार्गदर्शन
नवप्रभात NEWS / कुडाळ
पाट हायस्कूल एलिमेंट्री परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून ए ग्रेडमध्ये आठ विद्यार्थी तर बी ग्रेड मध्ये चौदा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत ए ग्रेड मिळाले विद्यार्थी अथर्व म्हापणकर सामंत, दिया मयेकर, सिया सर्वेकर, शिवानी मेस्त्री ,मिहीर धनदा सावंत बांदेकर किमया असे आहेत या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन मुख्याध्यापक शामराव कोरे पर्यवेक्षक राजन हंजनकर ज्येष्ठ शिक्षक गुरुनाथ केरकर कलाशिक्षक संदीप साळसकर तसेच सर्व संस्था पदाधिकारी यांनी केले
विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना कलाक्षेत्रातील पुढील संधी व ग्रेड मिळवण्याकरिता चित्ररचना कशा प्रकारे केल्या पाहिजे याचे मार्गदर्शन जेजे स्कूल ऑफ आर्ट चा विद्यार्थी आणि पाट हायस्कूलचा माजी विद्यार्थी श्री प्रथमेश करलकर यांनी केले यावेळी मानवाकृती रेखाटन परस्पेक्टिव्ह स्मरण चित्र या विषयाचे विशेष मार्गदर्शन केले चित्रणातील बारकावे मुलांना समजावून सांगितले त्याला विषयातील विविध अभ्यासक्रम यांची ओळख करून दिली पुढील काळात नोकरीच्या संधी नसल्यामुळे आपल्यातील असलेली कला ओळखा व ती वाढवा याविषयी विशेष मार्गदर्शन केले कोकणातील ग्रामीण भागात चांगल्या प्रतीचे कलाकार असून शाळा स्तरावरूनच त्यांना ओळखले पाहिजे आणि कलेच्या दिशेने प्रवास सुरू केला पाहिजे म्हणजे ही कला त्यांच्या उपजीविकेचे साधन बनेल असे मान्यवरांनी सांगितले मुलांनीही या मार्गदर्शन व त्याचा लाभ घेतला
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका पातळीवर प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments