वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत " शून्य कचरा- हळदी कुंकू समारंभ" साजरा
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
दिवसेंदिवस पर्यावरणाचे प्रदूषण वाढत आहे .त्याचा निसर्ग तसेच मानवी जीवनावर होणारा विपरीत परिणाम होत आहे .हा नैसर्गिक असमतोल निर्माण करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजेच आपण साजरे करणारे विविध सण व उत्सव. सर्वत्र लोकांमार्फत साजरा करण्यात येणाऱ्या विविध सण - उत्सवामधे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत सर्व सण- उत्सव हे पर्यावरण पूरक साहित्याचा वापर करून प्रदूषण मुक्त कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत . याच संकल्पनेस अनुसरून पर्यावरण पूरक शून्य कचरा कार्यक्रमाबाबत नागरिकांमधे जागरूकता निर्माण करण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत गुरूवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी घोडेबावं गार्डन , कॅम्प येथे दुपारी ३.३० वाजता "शून्य कचरा- हळदी कुंकू समारंभ" आयोजित करण्यात आलेला होता.
या कार्यक्रमामध्ये शहरातील ५०० हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. सदर कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या महिलांना वाण म्हणून झाडाचे एक रोपटे भेट देण्यात आले . या ठिकाणी हळदी कुंकू , फुले ,तिळगुळ , लाडू इ साहित्य ठेवण्यासाठी मातीची भांडी वापरण्यात आली .या ठिकाणी नैसर्गिक रंग व विड्याचे पान वापरून रांगोळी काढण्यात आली. तसेच कार्यक्रमासाठी कापडी बॅनर वापरण्यात आले. अशापद्धतीने या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारे प्लॅस्टिकचा वापर न करता पारंपरिक वस्तूचा वापर करून पर्यावरण पूरक असा "शून्य कचरा- हळदी कुंकू समारंभ" वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत साजरा करण्यात आला.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका पातळीवर प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments