रस्त्याच्या नावाखाली माडबागायतीचे नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा.
वेंगुर्ले कोंडूरा येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
ओरोस / प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील खानोली कोंडूरा ते येरम लिंगाचे देवालय या रस्त्याच्या नावाखाली आमच्या माड बागायतीचे अतोनात नुकसान करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून आम्हा शेतकऱ्यांच्या माड बागायतीवर होणारे अतिक्रमण तात्काळ थांबविण्या यावे अशी मागणी वायंगणी कोंडुरा येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे
आम्ही वायंगणी कोंडुरा तालुका वेंगुर्ला येथील गावचे कायम रहिवासी आहोत आपल्या निदर्शनास आणून देतो की गाव मौजे तळेकरवाडी येथील सर्वे नंबर 89 चा हि नंबर 3 व गाव मौजे तळेकरवाडी सर्वे नंबर 87 चा हि नंबर 1 या आमच्या सामायिक मिळकती असून सदर मिळकती या माड बागायतीच्या आहेत मच्छीमारी मोलमजुरी बरोबरच या माड बागायतीवरच आमचे उदरनिर्वाह अवलंबून आहे.
सदर मिळकती या मालक व कुळपणाच्या असल्याने भोगवटा नंबर दोनच्या मिळकती आहेत
सदर माड बागायत मिळकती मधून आम्ही अगर आमच्या वडिलोपार्जित कुणीही कुठल्याही कामाकरिता आमच्या जमिनी कुठल्याही कायदेशीर लेखाने कोणालाही दिलेल्या नाहीत.
असे असून सुद्धा कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग यांनी आमच्या मिळकतीमध्ये बेकायदेशीर अतिक्रमण करून आमच्या माड बागायतीचे नुकसान केलेले आहे याबाबत आम्ही मा. तहसीलदार वेंगुर्ले, मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, मा.कोकण आयुक्त ,मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांना लेखी निवेदने सादर करून आमच्या माडबागायती मध्ये बेकायदेशीर अतिक्रमण करून आमचे नुकसान करणाऱ्या कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग यांचे वर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे परंतु अद्याप पर्यंत आमच्या अर्जांचा विचार झालेला दिसून येत नाही.
आमच्या माड बागायतीच्या संरक्षणाकरिता पारंपारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या कुंपणाचे देखील रस्त्याच्या नावाखाली संबंधितांकडून वेळोवेळी नुकसान करण्यात आलेले आहे.
आमच्या माडबागायती मधून आम्ही कुणालाही रस्त्या करण्या करिता आमच्या जमिनी दिलेल्या नाहीत व देणार ही नाही सदर आमच्या मिळकती या कुळपणाच्या असल्याने शासनाच्या नियमानुसार आमच्या माड बागायती मधून ग्रामपंचायतीच्या अथवा जिल्हा परिषदेच्या मालकीचा रस्ता होऊ शकत नाही.
व अशा कुळपणाच्या जमिनीमध्ये कायदेशीर बाबींची पूर्तता न करता थेट अतिक्रमण करून शासनाचा कुठलाही रस्ता करता येत असल्यास आपण अथवा शासनाने तसे जाहीर करावे जेणेकरून आमच्यासारख्या महाराष्ट्रातील अन्य शेतकऱ्यांना देखील त्याची समज येईल.
वैयक्तिक एकाच्या फायद्यासाठी एका जमीन मालकाला हाताशी धरून संबंधित खात्याचे अधिकारी बेकायदेशीर आमच्या माडबागायती मध्ये कब्जा करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येते आमच्या माड बागायती मध्ये मशागतीच्या निमित्ताने दररोज आमच्या बायका मुलांचा नेहमी वावर असतो अशावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनासह संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे
तरी बेकायदेशीर अतिक्रमण करून आमच्या माडबागायतीचे नुकसान करणाऱ्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व आम्हा शेतकऱ्यांवर होणारा अन्याय त्वरित थांबविण्यात यावा अन्यथा आम्हाला आमच्या कुटुंबासह सर्वांना सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करून न्याय मागावा लागेल. असे पालकमंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी ,कोकण आयुक्त, अप्पर मुख्य सचिव ग्रामविकास विभाग, उपायुक्त आस्थापना कोकण विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना कोंडूरा येथील अन्यायग्रस्त शेतकरी नारायण पेडणेकर ,प्रशांत पेडणेकर ,निता पेडणेकर, प्रणाली पेडणेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
----------------------------------------------
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण, दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ,शिरोडा,बांदा, कसाल, ओरोस, येथे
प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातील वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments