हेल्प ग्रुप फाउंडेशन वायंगणीच्या वतीने ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र शाळा सुरंगपाणी वायंगणी येथे तालुकास्तरीय भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास एकाच वेळी ८० रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान केले यावर्षी ७५ वा प्रजासत्ताक दिन असल्याने हेल्प ग्रुप फाउंडेशन वायंगणी यांनी आगळावेळा उपक्रम राबवला या शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वेंगुर्ला एसटी आगाराचे आगार प्रमुख राहुल कुंभार, माजी सरपंच शामसुंदर मुणंनकर, खानोली विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन प्रशांत खानोलकर, केंद्र शाळा सुरंगपाणी शाळेच्या मुख्याध्यापिका शामल मांजरेकर उपस्थित होते.
दाभोली शाळा नं. २ शिक्षक प्रशांत चिपकर याना राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शामल मांजरेकर यांचाही सत्कार करण्यात आला. या रक्तदानासाठी सावंतवाडी आरोग्य विभाग ब्लड बँक व एस एस पी एम हॉस्पिटल पडवे या ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले तसेच उपकेंद्र आडेली यांचे मोलाचे सहकार्य मिळाले यावेळी ग्रुपचे उपाध्यक्ष हर्षद साळगावकर, प्रवीण राजापूरकर, महेंद्र सातार्डेकर, शेखर तोरस्कर, उल्हास कामत, नारायण पेडणेकर, प्रशांत पेडणेकर, सिद्धेश कोचरेकर, जाई नाईक, सिद्धी गावडे, प्रेरणा राजापूरकर,भिकाजी गावडे,प्रसाद पेडणेकर उपस्थित होते यावेळी शाळा व्यवस्थापन समिती यांचे मोलाचे सहकार्य लाभले प्रास्ताविक ग्रुपचे अध्यक्ष सुमन कामत यांनी केले तर सुत्र संचालन सुनिल नाईक यानी केले.
-------------------------------------------------------------------
🟨🟪🟨🟪🟨🟪🟨🟪🟨🟪🟨🟪🟨🟪🟨
श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट
यांच्या कुडाळ माडयाचीवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमामध्ये खालील प्रमाणे कर्मचारी भरती करावयाची आहे.
१) पुरुष सफाई कामगार /स्त्री सफाई कामगार 1
वयोमर्यादा 30 ते 35
२) स्त्री स्वयंपाकी - 1 - वयोमर्यादा 45
3) कॉम्प्युटर ऑपरेटर - 1 - स्त्री / पुरुष
महिलांना प्राधान्य
टिपः) स्थानिक व्यक्तींना प्राधान्य देणेत येईल.
2) फोटो, आधारकार्ड व रहीवाशी दाखल आवश्यक
3) कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी सैक्षणिक अर्हता MSCIT, टॅली आवश्यक
अनं. 1 व 2 साठी निवास व भोजन व्यवस्था केली जाईल. दिनांक 5 व 6 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी १०.०० ते दु.१.०० या वेळेत मुलाखतीस प्रत्यक्ष उपस्थित रहावे.
पत्ता: श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट जिव्हाळा सेवाश्रम , माडयाचीवाडी (रायवाडी) ता कुडाळ, जि.सिंधुदुर्ग.
Post a Comment
0 Comments