वेंगुर्ले मच्छीमार सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी सागर म्हाकले तर व्हाईस चेअरमन पदी आनंद वेंगुर्लेकर
वेंगुर्ले / प्रतिनिधी
वेंगुर्ला मच्छीमार सहकारी सोसायटी लिमिटेड वेंगुर्ला या संस्थेच्या कार्यालयामध्ये आज दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीबाबत माननीय श्री प्रशांत साळगावकर निवडणूक अधिकारी सहकारी श्रेणी -1 सहकार खाते वेंगुर्ला यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली यावेळी चेअरमन पदासाठी श्री सागर म्हाकले व श्री निलेश खडपकर या दोघांनी अर्ज सादर केले होते गुप्त मतदान घेतले असता या दोघांनाही सहा सहा अशी समान मते मिळाली त्यामुळे निताश गिरप यांच्या हस्ते ईश्वरी चिठ्ठी काढण्यात आली निताश गिरप यांनी सागर म्हाकले यांची चिठी काढल्यामुळे सागर म्हाकले यांची चेअरमन पदी निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी यांनी घोषित केले त्यानंतर संस्थेच्या व्हाईस चेअरमन पदासाठी सौ आयेशा हुले आणि श्री आनंद वेंगुर्लेकर या दोघांनी अर्ज सादर केले यावेळी गुप्त मतदान केले असता दोघांनाही सहा सहा अशी समान मते मिळाली श्री निताश गिरप यांच्या हस्ते ईश्वरी चिठ्ठी काढली असता श्री आनंद वेंगुर्लेकर यांच्या नावाची चिठ्ठी आल्यामुळे श्री आनंद वेंगुर्लेकर यांची संस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल निवडणूक अधिकारी यांनी घोषित केले
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात नवप्रभात या न्यूज चॅनल साठी काम करण्याची संधी.
📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातील प्रत्येक तालुक्यात व गावात काम करण्याची संधी.
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments