Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले सागरतीर्थ ग्रा.प.चे ग्रामसेवक बाळू गर्कल यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा... गोडकर यांची मागणी

वेंगुर्ले सागरतीर्थ ग्रा.प.चे ग्रामसेवक बाळू गर्कल यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा...
 गोडकर यांची मागणी

ओरोस / प्रतिनिधी

वेंगुर्ले तालुक्यातील सागरतीर्थ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बाळू गर्कळ यांचेवर अनधिकृत बांधकाम गैरव्यवहारप्रकरणी जमा कागदपत्रांची दखल घेऊन फौजदारी गुन्हा दाखल करून त्वरित बडतर्फ करण्याचे लेखी आदेश होणे करिता सागर तीर्थ येथील अंजनी अर्जुन गोडकर यांचे तर्फे शैलेश अर्जुन गोडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडले.

 उपरोक्त विषयांकित आमच्या वडिलोपार्जित सामायिक जमिनीमध्ये मार्च 2018 पासून अद्‌याप पर्यंत
बाधकाम चालू होऊन आजरोजी पूर्णकेलेले आहे. सदर बांधकामाबाबत आमचे वतीने मार्च 2018 पासून आजतागायत गावपातळीपासून मंत्रालयापर्यंत अर्ज
पाठपुरावा चालू आहे. सदर विषय अद्‌यापपर्यत मंत्रालयीन स्तरावर प्रलंबित आहे. असे असताना सदर प्रकरणी  बाळू गर्कळ ग्रामसेवक ग्रामपंचायत सागरतीर्थ, तालुका वेंगुर्ले यांनी पुन्हा जून 2023 नंतर जाणीवपूर्वक हेतुपुरस्कर बरेचसे गैरव्यवहार केलेले आहेत

सदर गैरव्यवहार प्रकरणी आम्ही कागदोपत्री पुराव्यासहित विभागीय स्तरावर संदर्भ 01) प्रमाणे दि. 16 ऑक्टोबर 2023 रोजी सदर उपोषणादरम्यान उप आयुक्त (आस्थापना) कोकण विभाग यांची ग्रामसेवक बाळू गर्कळ यांच्या समक्ष कायर्यालयीन भेट झाली त्यावेळेस त्यांनी आम्हास दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी च्या CEO यांचे कडील सुनावणी दरम्यान आपणास विषयांकित मुद्‌द्‌यास अनुसरून न्याय हक्क मिळेल असे तोड़ी आश्वासन दिले
परंतु असे असताना देखील आम्हास न्याय हक्क मिळत नसल्याने पुन्हा दि 15 जानेवारी 2024 रोजी
उपोषणाचा अर्ज देऊन विभागीय स्तरावर उपोषण केले असता विभागीय स्तरावरून न पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे विषयांकित मुदद्‌यास अनुसरून चौकशी करिता पत्र पाठवले आहे. सदर मुख्य कार्यकारी अधिकारी यांस दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने आज दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी उपोषणादरम्यान जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कागदपत्रे पुरावे सादर करणार आहे महोदय यांस विनंती अशी की श्री बाळू गर्कळ ग्रामसेवक ग्रामपंचायत सागरतीर्थ यांनी जून 2023 पासून सदर घरपत्रक उताऱ्यात जाणीवपूर्वक वरिष्ठाचे आदेशाचे अवमान करून चुकीच्या पद्धतीने फेरबदल केलेला आहे आज रोजी पर्यंत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी आपले स्तरावरून चौकशीचे आदेश होऊन ग्रामसेवक गर्कल यांचे वर फौजदारी गुन्हा दाखल करून बडतर्फ करण्यात यावे असे पालकमंत्री यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपोषण स्थळी भेट देऊन गोडकर यांना जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करावा आपल्याला न्याय हक्क मिळेल असे आश्वासन दिले.

🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
   
          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी 
कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण, दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ,शिरोडा,बांदा, कसाल, ओरोस, येथे
 प्रतिनिधी नेमणे आहे.
                📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.
                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातील वृत्तांकन करण्याची संधी
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments